Categories: Editor ChoicePune

माजी नगरसेवक ‘शंकरशेठ पांडुरंग जगताप’ … ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून स्वखर्चाने करणार किल्ले सिंहगडाच्या परिसराची स्वच्छता!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ ऑगस्ट) : काही लोक ध्येयवेडी असतात, आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जपणं हे आपलं कर्तव्य आहे, त्यातीलंच एक म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व उद्योगपती शंकर पांडुरंग जगताप होय. शंकर जगताप यांनी सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग , पुणे यांना किल्ले सिंहगड या राज्य संरक्षित स्मारकावरील नरवीर तानाजी मालुसरे समाधी स्थळ व परिसराची स्वच्छता , देखभाल व संवर्धनाची जबाबदारी घेण्यास मान्यता देणेबाबत विनंती केली होती.

त्यांच्या या मागणीत त्यांनी पुरातत्व खात्यास सामाजिक संस्था दायित्त्व ( Corporate Social Responsibility ) अंतर्गत ‘चंद्ररंग चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष यांच्यामार्फत स्वखर्चाने किल्ले सिंहगड , ता . हवेली . जि.पुणे या राज्य संरक्षित स्मारकाची स्वच्छता , देखभाल व परिरक्षण करण्याकरिता स्वखचान ४ पहारेकरी नेमण्यासाठी मान्यता मिळावी याबाबतचे पत्र दिले होते.

शंकरशेठ जगताप यांच्या पत्राची दाखल घेत, त्यांच्या ‘चंद्ररंग चॅरीटेबल ट्रस्ट , पुणे यांना स्वखर्चाने किल्ले सिंहगड , ता . हवेली , जि.पुणे या राज्य संरक्षित स्मारकाची स्वच्छता , देखभाल व परिरक्षण करण्याकरिता स्वखर्चाने पुर्णवेळ ४ पहारेकरी नेमण्यास संचालनालयातर्फे मान्यता देण्यात येत असल्याचे AM M ( डॉ.तेजस मदेम गर्गे ) संचालक , पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय , महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

सिंहगड किल्ला Sinhagad Fort – ४४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. अनेक नागरिक या ठिकाणी पर्यटनाकरिता येत असतात,त्यात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच असतात. तर काही सहकुटुंब सहलीकरीता येत असतात.

पुण्याच्या नैऋत्येला साधारण २५ कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा ह्यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूख गडावरुन दिसतो.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

5 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

5 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago