Google Ad
Editor Choice Education

जपानमध्ये करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी … पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय ( PCCOE )14 आणि 15 ऑक्टोबर 2022 रोजी घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शैक्षणिक संस्था संचलित ( PCET’S ) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय ( PCCOE ) , प्राधिकरण , निगडी , पुणे येथे दि . 14 आणि 15 ऑक्टोबर 2022 रोजी इंडो जपान बिझनेस कौसिल ( IJBC ) च्या सहकार्याने ‘ Know Japan ‘ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .

भारत – जपान संबंधांच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे . जपानमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे . ‘ Know Japan ‘ या इव्हेंट दरम्यान विद्यार्थ्यांना विविध जपानी विद्यापीठांमध्ये तसेच जपानी उद्योगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या शिक्षण , संशोधन आणि करिअरच्या संधी यांविषयी मार्गदर्शन केले जाईल . या कार्यक्रमात जपानी भाषा , संस्कृती , परंपरा आणि जपानी समाजातील चालीरीती याविषयी माहिती देणारी काही चर्चात्मक सत्रे देखील आयोजित केलेली आहेत .

Google Ad

जपान इंडस्ट्री मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्राची व्याप्ती , तज्ज्ञ व्यक्तींची चर्चासत्रे व्यवसाय आणि संगठनातील संधी याविषयांवर होणारी अनुभवांची देवाणघेवाण हि आपल्याकडील उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींसाठी महत्वाची असणार आहे . त्याद्वारे बऱ्याच उद्योगासाठी व्यापाराच्या नवीन आयामांची सुरुवात होईल असा आम्हाला विश्वास वाटतो , असे डॉ गोविंद एन . कुलकर्णी संचालक पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी संगितले .

जपानमध्ये करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी व त्यासाठी प्रयत्न करणान्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे . योग्य सहकारी कंपनी व्यापारातील संधी आणि जपानमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी लागणारे सहकार्य यावर ऊहापोह करण्याची संधी आपल्याकडील उद्योगजगतासाठी उपलब्ध होणार आहे . आत्तापर्यंत पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या आसपासच्या 1100 विद्यार्थ्यांनी ‘ Know Japan ‘ या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे . उद्योगक्षेत्रातील जवळपास 150 कंपन्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत .

डॉ फुकाहोरी यासुकाता ( जपानचे मुंबईतील वाणिज्य दूतावास चे प्रमुख सल्लागार ) यांनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास संमती दिली आहे आणि डॉ . ज्ञानेश्वर एम मुळे ( सदस्य , राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ) देखील या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . मान्यवर उद्योग प्रतिनिधींना ते स्वतंत्रपणे संबोधित करणार आहेत . डॉ गोविंद एन . कुलकर्णी ( संचालक PCCOE ) याबद्दल सांगताना म्हणाले की ‘ Know Japan ‘ इव्हेंट हा पिंपरी चिंचवड परिसरात सुविधा केंद्राच्या निर्मितीसाठी मैलाचा दगड ठरणार असून त्याचे उद्घाटन 14 आणि 15 ऑक्टोबर 2022 रोजी PCCOE कॅम्पसमध्ये सकाळी 9.00 वाजता होणार आहे .

डॉ . गिरीश देसाई ( पीसीईटीचे कार्यकारी संचालक ) यांनी सर्वांनी उत्साहाने सहभाग घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीसीईटीला मदत करावी असे आवाहन केले आगामी पिंपरी चिंचवडविद्यापीठाच्या ( पीसीयू ) पार्श्वभूमीवर प्रस्तावित विद्यापीठाला जागतिक परिमाण देण्यासाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा असल्याचेही ते पुढे सांगतात .

माननीय श्री हर्षवर्धन एस . पाटील ( महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विश्वस्त PCET ) यांनी ‘ Know Japan ‘ या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे . माननीय श्री हर्षवर्धन एस . पाटील या कार्यक्रमाला उपस्थित असतील श्री ज्ञानेश्वर पी लांडगे ( अध्यक्ष , PCET ) , श्रीमती पद्माताई भोसले ( उपाध्यक्ष , PCET ) , श्री व्ही एस काळभोर ( सचिव , PCET ) आणि श्री एस . डी . गराडे ( खजिनदार , PCET ) यांनी या अभिनव कार्यक्रमासाठी शुभेच्छा आणि आवश्यक ते सर्व सहकार्य केले आहे .

Know Japan ‘ इव्हेंटमध्ये स्वारस्य असलेल्या आजी माजी विद्यार्थी , पालक , उद्योगविश्वातील प्रतिनिधी आणि अन्य सर्वांना 14 आणि 15 ऑक्टोबर 2022 रोजी PCET च्या PCCOE , पुणे कॅम्पसमध्ये सकाळी 9.00 वाजल्यापासून कार्यक्रमासाठी आग्रहाचे आमंत्रण आहे .

यावेळी संचालक डॉ. गोविंद एन. कुलकर्णी, डीन – शैक्षणिक डॉ. शीतल यू. भंडारी, अनुराधा ठाकरे (डीन – आंतरराष्ट्रीय संबंध), (असोसिएट डीन – आंतरराष्ट्रीय संबंध) डॉ. रोशनी राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!