Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड शहरातील यंदाच्या गणेशोत्सव नियोजनाकरिता … महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिस यांची झाली संयुक्त नियोजन बैठक!

महाराष्ट्र 14 न्यूज, (३० ऑगस्ट २०२१) : कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून शहरातील गणेशोत्सव उत्साही व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन व महानगरपालिका समन्वय साधून कामकाज करावे असे निर्देश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहरातील यंदाचा गणेशोत्सव कोरोना-१९ विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शांततामय व उत्साही वातावरणात पार पडण्यासाठी महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिस यांची संयुक्त नियोजन बैठक महानगरपालिका मुख्यालयातील कै. मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अप्पर पोलिस आयुक्त संजय शिंदे, सुधीर हिरेमठ, महानगरपालिकेचे उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, सतीश इंगळे, पोलिस उपआयुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सोनम देशमुख, सुचिता पानसरे, श्रीनिवास दांगट, सिताराम बहुरे, विजयकुमार थोरात, उमाकांत गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सागर कवडे, प्रेरणा कट्टे, श्रीकांत दिसले, संजय नवलेपाटील, एन.एस.भोसले-पाटील, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते.

Google Ad

यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी गणेशोत्सवा दरम्यान शहरामध्ये नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करणेसाठी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वर्षी कोरोना-१९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून गणेशोत्सवामध्ये नागरिकांची बाजारपेठांमध्ये तसेच गणेश मंडळांजवळ गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रभागस्तरावर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांची फिरती पथके नियुक्त करणे आवश्यक आहे. गणेश मूर्ती दान म्हणून स्विकारणा-या वाहनांची योग्य ती सजावट करावी. गणेश मंडळांसोबत प्रत्येक क्षेत्रीय अधिका-यांनी प्रभागस्तरावर बैठकांचे नियोजन करावे. नागरिकांमध्ये गणेशोत्सवाच्या नियमांबाबत जागृती करणेसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेवून गणरायाचे ऑनलाईन दर्शनसाठी गणेश मंडळांना आवाहन करणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासन लवकरच पोलिस स्टेशननिहाय गणेश मंडळांच्या बैठकांचे आयोजन करेल असे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले. घरगुती गणेश मुर्त्यांची संख्या लक्षात घेवून त्या दृष्टीने मूर्तीदान स्विकारणा-या रथांची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे.

नागरिकांमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेबाबत विशेष जागृती मोहीम राबविण्यात येईल. तसेच कोरोना-१९ विषयक नियमांचे पालन करणेबाबत देखील आवाहन करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

36 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!