Google Ad
Uncategorized

पुणे जिल्हा अथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने पहिल्यांदाच सांगवी येथे सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांनी सांगवी मधील गजानन महाराज मंदिर या ठिकाणी केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माननीय श्री सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,प्र कुलगुरू पराग काळकर,माजी महापौर माई ढोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच सांगवी मॅरेथॉनच्या पारितोषिक वितरणासाठी कार्यसम्राट आमदार चिंचवड विधानसभा श्री शंकर भाऊ जगताप तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सातारा,सांगली, बारामती नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या खेळाडू व हौशी मॅराथॉन पटूंनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.

पुणे जिल्हा अथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने पहिल्यांदाच सांगवी या ठिकाणी सौ.सारिका कृष्णा भंडलकर यांनी मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने, अहिल्या माता होळकर यांच्या साडेतीनशे व्या जयंतीनिमित्त व नुकत्याच आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या झालेल्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एक उत्तम व निरोगी पिढी घडवण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे असे श्रीशंकर भाऊ जगताप यांनी आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केली तसेच प्रास्ताविकामध्ये सौ. सारिका कृष्णा भंडलकर यांनी आगामी काळामध्ये अशाच स्पर्धा सांगवी भागातील नागरिकांसाठी घेतल्या जातील याबद्दल आपला मनोदय व्यक्त केला.

Google Ad

कार्यक्रमाच्या सुरुवातीला झुंबा नृत्य आणि सुरुवात करण्यात आली प्राध्यापक अमित गोगवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अक्षय काशीद,दत्ता कांबळे,क्रीडा संचालक सुदाम शेळके गणेश गावडे तुषार सर, किशोर साळुंखे, अनिरुद्ध शर्मा साक्षी वाघमारे, समृद्धी वाघमारे मनीषा बुरले , संस्कृती नेटके , सोनिया खेले आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी आप्पा ठाकर, गणेश ढोरे कमलाकर जाधव,जवाहर ढोरे, युवराज ढोरे,विजय साने आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!