कोरोना पार्श्वभूमीवर बालकांच्याकाळजी आणि संरक्षणासाठी … पिं.चिं. महापालिका स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १८ मे २०२१) : कोविड१९ रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या कृती दल (टास्क फोर्स) यांना माहिती देण्याकरीता महापालिका स्तरावर त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आज आदेश निर्गमित केले आहेत.

प्रभारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप हे या समितीचे प्रमुख असतील तर नागरवस्ती विकास योजना विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांची समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, बाधित व्यक्ती आणि मृत्युंचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने पालक गमावलेल्या आणि अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या राज्यात निर्माण झाली आहे. ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बाल कामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांचा बळी ठरण्याची ठरण्याची शक्यता जास्त आहे.

अशा बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणे आवश्यक आहे. त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यासाठी, सतेच कोविड१९ रोगाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्यास अशी बालके सुरक्षित निवारा, योग्य पोषणापासून वंचित राहण्याची तसेच त्यांच्या शोषणाची जोखीम वाढते. त्यामुळे या परिस्थितीत अशा बालकांसाठी अतिरिक्त प्रयत्न आवश्यक असल्याने जिल्हास्तरावर जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठीत करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचा तातडीने शोध घेवून त्यांचा अचुक माहिती कृती दलाला उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकास्तरावर अधिका-यांची समिती गठीत केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

5 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

12 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago