Google Ad
Uncategorized

१५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी …. महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही पूर्वसूचना न देता थेट सुनावणीस उपस्थित राहून लेखी समस्या मांडता यावी याकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबईमार्फत १५ ते १७ एप्रिल या कालावधीत पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी चिंचवड शहरासाठी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, पाचवा मजला येथे सकाळी १० वाजता पुणे शहरासाठी १५ एप्रिल रोजी तर पुणे ग्रामीणसाठी १६ एप्रिल रोजी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दिवंगत महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृह, पिंपरी येथे १७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वा. जनसुनावणी घेण्यात येणार आहे.

Google Ad

या सुनावणीकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष उपस्थित राहणार असून पीडित महिला, तक्रारदार महिलांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!