Google Ad
Editor Choice political party

एकनाथ खडसेंपाठोपाठ भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर रक्षा खडसे यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या …

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडताना केलेल्या गंभीर आरोपांनंतरही फडणवीस घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान एकनाथ खडसेंपाठोपाठ भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर रक्षा खडसे यांनी उत्तर दिलं आहे. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जाहीर प्रवेशात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता. दरम्यान खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे अद्याप भाजपातच आहेत.

Google Ad

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत विचारण्यात आलं असता रक्षा खडसे यांनी सांगितलं की, “अशा चर्चा खूप होत असतात, पण जोपर्यंत मी काही अधिकृत सांगत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही”. पक्षाने जबाबदारी दिली तर पुढील निवडणूकही भाजपाकडूनच लढणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असं नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घऱी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले आहेत. एकनाथ खडसे यांचंही त्यांच्याशी बोलणं झालं. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणं आणि चहा पाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे,” असं रक्षा खडसे यांनी म्हटलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

62 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!