महाराष्ट्र 14 न्यूज, दि.७ नोव्हेंबर २०२४ – यंदाची विधानसभा निवडणूक ही फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा परिपूर्ण विकास या एकाच ध्येयाने मी लढत आहे. मागील दहा वर्षात स्व. आमदार लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनीताई यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सोसायट्यांमधील समस्या सोडविण्यात आम्हाला बऱ्याच अंशी यश आले आहे. तरीही आगामी काळात सोसायट्यांच्या उर्वरित समस्याबाबत विधानसभेत आवाज उठवत त्या समस्या मार्गी लावून सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अभिमान वाटेल असा विकास करून दाखविणार, असे आश्वासन चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिले.
भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील रूणवाल क्लासिक सोसायटीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे, तानाजी बारणे, दिनेश यादव, कुंदन सिंग, अशोक बानखेले, बळवंत फावडे, अरुण गायकवाड, राजेंद्र शेळके, संतोष टेकाळे, डी.एम. कोळी, तुषार नाणेकर, मधुकर आंब्रे यांच्यासह सोसायटीतील पदाधिकारी, सदस्य व रहिवासी तसेच महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले की, कोणतीही निवडणूक ही आरोप-प्रत्यारोप, जाती-धर्मावर किंवा मतदारांची दिशाभूल करून न होता फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे. लोकसभेच्या वेळी विरोधकांनी फेक नरेटिव्हचा वापर करून जनतेची फसवणूक केली. मात्र यावेळी जनता या भूलथापांना आणि अपप्रचाराला बळी पडणार नाही, असा मला विश्वास आहे.
मागील अनेक वर्षांपासून चिंचवड विधानसभाच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातील अनेक समस्या या मूलभूत आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र आगामी काळात शासन दरबारी आवाज उठवून सोसायटीतील रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा शब्द जगताप यांनी सोसायटीधारकांना यावेळी दिला.
दरम्यान, रूणवाल क्लासिक सोसायटीतील सर्व सदनिकाधारकांनी या निवडणुकीत भाजपला मतदान करून महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवायचे असा निर्धार यावेळी एकमताने केला.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…