Google Ad
Editor Choice india

U.P. : आधी बुलेट मगच निकाह , अडून बसला नवरदेव … नवरीनं केलं असं काही की … सर्वांचेच धाबे दणाणले!

महाराष्ट्र 14 न्यूज : उत्तर प्रदेशच्या बरेली शहरातील इज्जतनगर मधील परतापूर चौधरी या गावाची सध्या सगळीकडं चर्चा सुरू आहे. याठिकाणी बुधवारी एका तरुणीचा निकाह होणार होता. सर्वकाही ठिक पद्धतीनं सुरू होतं. पण नवरदेवानं हुंड्यामध्ये बुलेटची मागणी केली. बुलेट आणा तरच लग्न होईल असं नवरदेव म्हणाला. सगळ्यांनाच धक्का बसला. नवरीसाठीही लहा धक्काच होता. पण त्यातून स्वतःला बाहेर काढत तिनं लालची नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना असा धक्का दिला की, आता सगळीकडं तिचं कौतुक होतंय.

बुधवारी इज्जनगरमध्ये एका लग्नाच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. सोहळ्यासाठी वरातदेखिल पोहोचली होती. सगळे पाहुण्यांचं स्वागत पाहुणचार करण्यात व्यस्त होते. काही वेळातच नवरदेव झीशान आणि नवरी कुलसुम यांचा निकाह होणार होता. पण त्याआधीच नवदेव झीशान खान यानं मुलीच्या वडिलांसमोर फर्माईश केली. आधी बुलेट घेऊन या मगच निकाह होईल, असं नवरदेव म्हणाला. नवरदेवाच्या आई, बहीण सर्वच कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिला.

Google Ad

अनेकजण नवरदेवाला समजावत होते. पण नवरदेव त्याच्या मागणीवर अडून होता. त्याला लगेचच बुलेट हवी होती.
हा सगळा प्रकार सुरू असताना नवरी म्हणजे कुलसुमलाही धक्का बसला होता. नातेवाईक नवरदेवाला समजावत असल्यामुळं ती काही काळ शांत होती. पण काही वेळानं तिनं मनाशी दृढ निश्चय केला आणि एक कठोर निर्णय घेतला. सर्व वऱ्हाडींमध्ये कुलसुम आली आणि म्हणाली, आता हुंड्याची लालच असलेल्या अशा व्यक्तीशी मलाच लग्न करायचं नाही.

नवरीचा असा आक्रमक पवित्रा पाहताच नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय हादरले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. परिस्थिती आपल्या विरोधात गेल्याचं लक्षात येताच ते बुलेट शिवाय निकाह करायला तयार तयार झाले. पण आता कुलसुमचा निर्णय पक्का होता. या मुलाशी लग्न करायचंच नाही यावर ती ठाम होती. अशा हुंड्यासाठी लालची लोकांच्या घरची सून बनायचं नाही असं ती म्हणाली. नवरदेवाकडची मंडळी तिला समजवायला लागली, पण तिनं वरात परत न्या नसता पोलिसांना बोलावून सर्वांना तुरुंगात पाठवेन, असा इशारा दिला. त्यानंतर सर्वच हादरले आणि नवरीचा आक्रमकपणापासून त्यांना वरात परत न्यावी लागली.

बूक झाली होती बुलेट…
या संपूर्ण प्रकारात धक्कादायक बाब म्हणजे नवरीच्या वडिलांनी बुलेट द्यायला नकार दिला होता असं नाही. त्यांनी पैसे भरून बुलेट बूक केली होती. पण लॉकडाऊनमुळं सर्वकाही बंद असल्यानं बुलेट मिळू शकली नाही. नवरीच्या वडिलांनी बुकींगची पावती दाखवत नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना निकाह करण्याची विनंती केली. शोरूम उघडताच बुलेट मिळेल असही सांगितलं. पण नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय अडून राहीले. लगेचच बुलेट हवी अशी त्यांची मागणी होती. त्यांना सर्वांनी समजावलं पण कशाचाही फायदा झाला नाही.

नवरदेवाला पश्चाताप
वरात परत घेऊन घरी आलेल्या नवरदेवाला या सर्व प्रकाराचा प्रचंड पश्चातापही झाला. कुटुंबीयांनी भरीस घातल्यामुळं हुंड्यामध्ये बुलेट मिळण्याची चुकीची जिद्द मी धरली होती. या गोष्टीची आयुष्यभर खंत राहील असं झीशान म्हणाला. मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये कुलसुम हीनं ज्या पद्धतीनं तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या स्वाभिमानासाठी ठाम भूमिका घेतली, त्याचं सगळीकडं कौतुक होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!