Categories: Education

पिंपरी चिंचवड मनपा देणार विधवा आणि घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य” … पहा,काय आहेत नियम व अटी

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. ८ जुन २०२२) :- महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शहरातील विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य महापालिका करणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

महिला वर्गाला सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी महापालिकेमार्फत विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जातात. महिलांना स्वयंरोजगारासाठी उत्तेजन देण्यासाठी तसेच त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने “मा. अटलबिहारी वाजपेयी विधवा आणि घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचा घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य” या योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेच्या लाभाच्या स्वरुपात तसेच काही अटी आणि शर्तींमध्ये आता सुधारणा करण्यात आल्या आहेत.

पूर्वी या योजनेद्वारे विधवा आणि घटस्फोटीत महिलांना १० हजार रुपये इतकी रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्यात येत होती. या योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. विधवा आणि घटस्फोटीत महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शहरातील महिलांना २५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. तर असे प्रशिक्षण न घेतलेल्या महिलांना घरगुती व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वी अर्जदाराला तहसीलदार यांच्याकडील २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारा दाखला अथवा २ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या रेशनकार्डची प्रत अनिवार्य होती परंतु आता यात बदल करण्यात आला असून यासाठी आता तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकारी यांचा २ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणारा दाखला अथवा प्राधान्य घरगुती शिधापत्रिका असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणाऱ्या विधवा आणि घटस्फोटीत महिलांनी मनपा हद्दीतील आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. यासोबत मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत, घटस्फोटीता महिलांच्या बाबतीत न्यायालयाच्या आदेशाची प्रत, विधवा स्त्रीयांच्या बाबतीत पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची प्रत जोडणे अनिवार्य राहील. तसेच अर्जदार महिलेचे वय अर्ज केलेल्या दिनांकास ५० वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या कौश्यल्य प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास २५ हजार रुपये अर्थसहाय्य आणि प्रशिक्षण घेतले नसल्यास १५ हजार रुपये अर्थसहाय्य देय राहील.

Maharashtra14 News

Recent Posts

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

1 hour ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

16 hours ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

18 hours ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

5 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

6 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

1 week ago