Google Ad
Editor Choice

फुगेवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला … पिंपरी युवासेनेकडून अर्थिक मदत !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे दिनांक २८/०८/२०२१ रोजी सकाळी सुमारे ९.३० च्या दरम्यान मडके कुटुंबाचे राहते घर कोसळले घरामध्ये दुर्घटने वेळी दोन मुली व त्यांची आई घरात उपस्थित होते स्थानिक रहिवासी पोलीस प्रशासन अग्निशामक दल रेस्क्यू टीम यांच्या सहकार्याने घर कोसळत असताना प्रथम एक मुलगी व आईला वाचविण्यात यश आले.अजून काही भाग कोसळल्याने घरात मातीच्या ढिगार्याखाली पौर्णिमा मडके अडकून राहीली तीन तासाच्या अथक प्रयत्नातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

परंतु मध्यमवर्गी असलेल्या मडके कुटुंबावर एक प्रकारे संकटच कोसळले हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे राहते घर क्षणातच नाहिसे झाले घरात पौर्णिमाचे वडील एकटेच कमवते शिपायाची नोकरी त्यातच उदरनिर्कुवाहासह कुटुंब सावरणे व नवीन घर बांधणे अवघड आहे तरी सदर कुटूंबाचा गांभीर्याने विचार करत मडके कुटुंबाला आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी पिंपरी युवासेनेतर्फे युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे ह्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मडके कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला.

Google Ad

ययावेळी संपर्क प्रमुख सचिन आहेर, खासदार श्रीरंग बारणे, विस्तारक राजेश पळसकर,अनिकेत घुले,शहरप्रमुख सचिन भोसले, शहरसंघटिका उर्मिला काळभोर,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, योगेश बाबर युवासेना शहरप्रमुख विश्वजित बारणे,अजिंक्य उबाळे,राजेंद्र तरस, माऊली जगताप,रुपेश कदम,प्रतीक्षा घुले, शीला जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!