Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन घेण्याकरिता अर्थसहाय्य … पिंपरी चिंचवड मनपाने दिली दुसऱ्यांदा संधी!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.५ मार्च २०२१ ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील दिव्यांग कल्याणकारी योजने अंतर्गत “दिव्यांग व्यक्तींना उपयुक्त साधन (चलन-वलन) घेणेकामी अर्थसहाय्य” या योजने अंतर्गत सन २०१९-२० मध्ये ज्या लाभार्थ्यांचा अर्ज पात्र झालेला आहे, परंतु उपयुक्त साधन खरेदी करुन महापालिकेकडून अर्थसहाय्य मिळणेकामी, साधन खरेदी केलेची मुळ GST पावती महापालिकेकडे जमा केली नाही.

अशा लाभार्थ्यांनी दि. ०६/०३/२०२१ ते १२/०३/२०२१ या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील माहिती केंद्रामध्ये सकाळी ११.०० ते सायं. ४.०० या वेळेत सदर पावती जमा करावी. सुट्टीच्या दिवशी देखील सदर कामासाठी माहिती केंद्र चालू ठेवण्यात येणार असुन लाभ मिळणेसाठीची ही द्वितीय संधी देणेत येत असल्याचे संभाजी ऐवले
समाज विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!