Categories: Editor Choice

अखेर, 2 मंत्रिपदं महिलांकडे … शिंदेंच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार , सूत्रांची माहिती , कोणती नावं चर्चेत ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि . २३ ऑगस्ट) : अखेर आता शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळणार आहे.

9 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार झालाय. यात शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 18 आमदारांनी शपथ घेतली. पण या अठरा जणांमध्ये एकाही महिला नेत्याला स्थान दिलेलं नव्हतं. त्यावरून भरपूर टीकाही झाली. पण आता पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळणार आहे. दोन महिला आमदारांना मंत्रिपदं दिली जाणार आहेत. एक कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद महिलांना दिलं जाणार आहे. त्यामुळे प्रचंड टीकेला सामोरं गेल्यानंतर अखेर आता महिलांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणती नावं चर्चेत
देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. देवयानी फरांदे या नाशिकच्या आमदार आहेत. तर माधुरी मिसाळ या पुण्याच्या आहेत. तर मनिषा चौधरी आणि सीमा हिरे या दोघींचीही नावं चर्चेत आहेत. मनिषा हिरे या नाशिकच्या आहेत. विशेष म्हणजे या चारही महिला नेत्या या भाजपच्या आहेत.

9 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप झालं. सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. तर गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.

▶️कुणाकडे कोणतं खातं?

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे: कामगार

संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत: उद्योग

प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार: कृषी

दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago