Google Ad
Editor Choice

अखेर पक्ष प्रवेश झाला … नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षानी साधला अचूक निशाणा !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीचे बिगुल वाजायला लागले तशी उड्या मारणारांची सुरुवात झाली,कारण आता १३मार्च पासून महानगरपालिकेत प्रशासक लागू शकते. त्यामुळे उड्या मारणारांना काहीही फरक पडत नाही. त्यामुळे शहरात भोसरी परिसरातील भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी कालच आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.

प्रभागातील विकासकामे करण्यास वरिष्ठांच्या मुळे अडचण येत असल्याने आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण यावेळी नगरसेवक वसंत बोराटे यांनी पुढे केले होते . वसंत बोराटे हे भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे समर्थक मानले जात होते,काल आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी नगरसेवक वसंत बोराटे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. आणि नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष यांना पहिला नगरसेवक आपल्या पदरात पाडून घेण्याची आयती संधी मिळाली.

Google Ad

बोराटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी – चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे , महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट , माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल ,सुनील लोखंडे उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!