Categories: Editor Choice

अखेर, पिंपरी चिंचवड मनपाचा आरोग्य विभाग लागला कामाला … महाराष्ट्र 14 न्यूज, च्या बातमीचा परिणाम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ ऑगस्ट) : पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे शहरात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. महिनाभरात पिंपरी चिंचवड शहरात अनेक जणांना मलेरिया; तर काही जणांना डेंगीची लागण झाली आहे. शिवाय महापालिकेच्या दवाखान्यात आणि रुग्णालयात मलेरियाचे संशयित रुग्ण आढळून आले असल्याचे दिसत आहे, तरीही पिंपरी चिंचवड आरोग्य विभाग सतर्क झाल्याचे दिसत नाही अशी बातमी (दि.२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र14 न्यूज ने प्रसिद्ध केली होती.

डासांची पैदास रोखण्यासाठी प्रयत्न महापालिकेकडून यापूर्वी डासांसाठी धुरीकरण केले जात होते; परंतु महापालिकेने जुलै महिन्याच्या सुरवातीला सर्वच आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसत आहे, काहीजण बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू झाले, तर काही भागाला अजूनही अधिकारी मिळाले नाहीत.

महानगरपालिकेच्या ह’ प्रभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सांगवी-नवी सांगवी या भागातील समान्य नागरिकांना या कारभाराचा  मात्र नाहक त्रास सहन करावा लागत होता, ही बाब आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली, याची दखल घेत आज (२५ ऑगस्ट) नवी सांगवीच्या काही भागात धुरीकरण करणारे मशीन (फोगिंग मशीन ) घेऊन धुरीकरण करण्यात आले. आता धुरीकरण तर झाले,पण या धुरीकरण करीता वापरण्यात आलेल्या औषधाांचा डासांवर काय परिणाम होतो ते आता कळेलच

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

2 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

6 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

6 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago