Categories: Uncategorized

अखेर राज्य मंत्रिंमंडळाचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला कोणते मंत्रालय

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता.मात्र खाते वाटप जाहीर करण्यात आलं नव्हंत अखेर आता खाते वाटप जाहीर झालं आहे.

महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं आहे. सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्‍यांना खातेवाटप जाहीर झालं. या मंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात विनाखात्याचे मंत्री म्हणून काम केलं. अखेर शनिवारी त्यांचे खातेवाटप झाले आहे. गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच आहेत.

मंत्रीमंडळाचे खातेवाटप याप्रमाणे

देवेंद्र फडणवीस – गृह
अजित पवार – अर्थ
एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहकसंरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणराज्यमंत्री
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण

Maharashtra14 News

Recent Posts

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 days ago

एकाच तिकीटावर मुंबईकरांना सर्व पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वापरता येणार’

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…

4 days ago

महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा झाला सैन्यदलात लेफ्टनंट…* *आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नवनियुक्त लेफ्टनंट शिवराज मोरे यांचा सन्मान..

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…

2 weeks ago

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांच्या वतीने … पिंपळे गुरव परिसरात २० हजार नागरिकांना दिनदर्शिका वाटप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…

3 weeks ago

स्वच्छतेमुळेच पेशंट बरे होण्यास मदत होते – नवनिर्वाचित आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालयास भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…

3 weeks ago