Google Ad
Editor Choice Pune

अखेर राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यपदाची माळ प्रशांत जगताप यांच्या गळ्यात

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्ष पदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती केली आहे. आमदार चेतन तुपे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज प्रशांत जगताप यांच्या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जगताप यांना देण्यात आले. या वेळी सुभाष जगताप , विशाल तांबे, बाबुराव चांदेरे , नंदा लोणकर आणि आ. चेतन तुपे उपस्थित होते.

कार्यकर्ता, पीएमटी सदस्य ,पीएमटी अध्यक्ष,नगरसेवक ते महापौर असा प्रवास असलेले जगताप यांच्या मातोश्री देखील राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. चेतन तुपे हे मागील अडीच वर्षापासून पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून त्यांनी शहराध्यक्ष पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Google Ad

त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. अखेर शहराध्यपदाची माळ प्रशांत जगताप यांच्या गळ्यात पडली. प्रशांत जगताप यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान पक्षाचे प्रभारी शहराध्यपद भूषवले आहे. विद्यमान शहराध्यक्ष चेतन तुपे यांना हडपसरमधून उमेदवारी दिल्यानंतर पक्षाने प्रशांत जगताप यांना प्रभारी शहराध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी ही जबाबदारी योग्य पद्धतीने पेलली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

74 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!