महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जून,) : धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑप बँकेची पंचवार्षिक निवडणुक २०२३ – २०२८ ही ०४ जून रोजी मतदान होऊन, आणि आज ०५ रोजी मत मोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष यांच्या धर्मवीर संभाजी सहकार पॅनलचे १५ पैकी १३ उमेदवार विजयी झाले, तर विरोधात असणाऱ्या धर्मवीर संभाजी बँक बचाव पॅनल चे ०२ उमेदवार विजयी झाले. भागधारक, खातेधारक, सभासदांनी पुन्हा एकदा बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून बँक त्यांच्या ताब्यात दिली.
या विजयी उमेदवारांमध्ये धर्मवीर संभाजी सहकार पॅनलचे कपबशी चिन्ह असलेले उमेदवार संस्थापक शितोळे बाबुराव विठ्ठल, बँकेचे विध्यमान अध्यक्ष अॅड. झोळ गोरखनाथ गेनबा तर चौधरी उत्तम किसन, शितोळे गोकुळ जनार्दन, शिंदे सुभाष बापूराव, जाधव राहुल बाळू, अॅड. थोरात आनंद गोरख, अॅड. माघरे सुभाष सावन, शितोळे बाबुराव विठ्ठल, कापसे ज्योती अंकश, शितोळे शैलजा बाबुराव, चव्हाण अनंता चंद्रकांत,चौधरी सचिन सुनिल हे उमेदवार विजयी झाले. तर धर्मवीर संभाजी बँक बचाव पॅनल चे दिलीप तनपुरे आणि राकेश पठारे हे अवघ्या काही मतांनी विजयी झाले. यावेळी शैलजा शितोळे व बाबुराव शितोळे हे दोघे पतिपत्नी आणि बंधू गोकुळ शितोळे बँकेत संचालक असणार आहेत.
अतिशय चुरशीच्या लढतीत बँकेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष यांनी आपली बँकेवरील सत्ता कायम ठेवली नवनिर्वाचित संचालक व समर्थकांनी धर्मवीर संभाजी सहकार पॅनलच्या प्रचार कार्यालयात जल्लोष साजरा केला. सभासदांच्या बँकेच्या हिताचे कार्य केल्याने मतदारांचा आमच्यावर विश्वास होता आणि त्यामुळेच आमचा विजय झाल्याचे बाबुराव शितोळे यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेवून बँकेच्या प्रगतीचा आलेख कायम उंचावत ठेऊ,. कामगारनगरी पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य, कष्टकरी नागरिकांची ‘अर्थवाहिनी’ अशी धर्मवीर संभाजी सहकारी बँकेची ओळख आम्ही निर्माण केली, असेही बाबुराव शितोळे यावेळी बोलताना म्हणाले.