Google Ad
Editor Choice Maharashtra

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून फिल्डिंग … प्रशांत शितोळे यांची पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांकडे मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जून) : आपल्या देशामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची संभावना असून त्याकडे लक्ष देणे आणि उपाययोजना या बाबत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांनी काही सूचना केल्या आहेत. याकरिता त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना त्यांनी निवेदन दिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, प्रशासन म्हणून संभाव्य लाटेमध्ये वैद्यकीय व्यवस्था उपचार व्यवस्था व्यवस्थित राहतील यासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी आपण रुग्णालयांची उपलब्धता लहान मुलांकरिता बेडची व्यवस्था व नियोजन करत असल्याचे समजते.

केवळ रुग्णालय ,बेड यांच्यासह आवश्यक व योग्य औषधांची देखील कमतरता पडणार नाही यासाठी देखील नियोजन व्हावे म्हणून या पत्राद्वारे मागणी व विनंती आहे. लहान मुलांना प्रसन्न वाटेल अशा रुग्णालयातील व्यवस्थेसह संभाव्य लहान मुले व बाळांसह त्यांच्या आईला सुध्दा याठिकाणी राहता येईल. ( Baby with Mother ) अशी व्यवस्था देखील आपणास उपलब्ध करावी लागणार आहे याची दक्षता घ्यावी लागेल. दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिविर व इतर इंजेक्शनचा संपूर्ण देशातील तुटवडा , काळा बाजार आपण अनुभवला आहे व त्या दूरदरम्यान अनेकांना प्राण गमवावे लागले हे आपल्याला ज्ञात आहे.

Google Ad

संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी काही विशिष्ट प्रकारची इंजेक्शन्स उपयोगास येतात असे समजते व यासाठी Human Normal Immunoglobulin For Intravenous Use साठी तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून उपयुक्त असणारे इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही व उपलब्धता रास्त दरात होऊ शकेल अशी तजवीज करावी यासाठी आपण तातडीने अशा प्रकारचे इंजेक्शन किंवा उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांबरोबर चर्चा करावी व शहरासाठी याचे नियोजन करावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

तसेच नियोजनामध्ये सदर बाबींचा विचार व्हावा तसेच आम्ही देखील एक कर्तव्य म्हणून आपण द्याल ती जबाबदारी पार पाडू म्हणून देखील या पत्राद्वारे खात्री देत आहोत. सर्वच नागरिक लहान मुले व बाळांमध्ये कोरोना ची तिसरी लाट पसरू नये हीच भावना असून त्यासाठीच जास्त संवेदनशील आहेत त्याकरिता योग्य ते नियोजन व्हावे हीच मागणी व विनंती, त्यांनी या निवेदनाद्वारे आयुक्तांना केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!