Google Ad
Editor Choice

कोयत्याचा धाक, लोखंडी पाईपने मारहाण, पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाईल लुटणारे तिघे जेरबंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ऑक्टोबर) : कोयत्याचा धाक दाखवत लोखंडी पाईपने मारहाण करुन पादचाऱ्यांचे मोबाईल लुटणाऱ्या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहत परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे.

पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहतीमधील जंबुकर वस्तीमधून पायी जाणाऱ्या व्यक्तींची लूट करण्यात आल्याचा आरोप आहे. कोयत्याचा धाक दाखवत लोखंडी पाईपने मारहाण करुन तिघा आरोपींनी पादचाऱ्यांचे मोबाईल लुटले होते. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

Google Ad

आरोपी सुरज रोकडे, प्रतीक आढाव आणि त्यांच्या सोबत असलेल्या अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. चोरी केलेला हा मोबाईल नाणेकरवाडी येथील प्रतीक मोरे याला विकला असल्याचं त्यांनी कबूल केलं. त्यानंतर चोरीचा मोबाईल घेणारा आरोपी प्रतीक मोरे याला देखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबईत वॉचमनची घरफोडी

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!