Google Ad
Editor Choice

पर्यावरण विभागाच्या कारभाराविरुद्ध … रयत विद्यार्थी परिषदेचे उपोषण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ नोव्हेंबर) : कुदळवाडी येथील नैसर्गिक नाल्यावर बांधकाम करून महापालिकेचा पर्यावरण विभाग मनमर्जी कारभार करत आहे. या आले आहे. कारभाराची चौकशी व्हावी आणि हे काम तातडीने थांबवावे, या मागणीसाठी रयत विद्यार्थी परिषदेने गुरुवारी (दि. २४) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे चिखली, कुदळवाडी येथे नाल्यावरच तीन एलएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम चालू आहे. या प्रकल्पासाठी तब्बल आठ कोटी रुपये खर्च होणार आहेत. कुदळवाडी भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढले

Google Ad

आहे. कारखान्यांचे सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जाते. पर्यावरण विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबवून हे काम देण्यात

नैसर्गिक ओढे, नाले बुजवल्यामुळे शहरातील अनेक भागात आजही पुराचा धोका सतावत आहे, असे असताना महापालिका प्रशासन स्वतःच नाल्यावर असे प्रकल्प उभारत आहे. त्याविरोधात रयत विद्यार्थी परिषदेच्या वतीने एकदिवसीय उपोषण करण्यात आले. हे अनधिकृत बांधकाम थांबवावे तसेच झालेले काम त्वरित काढण्याची मागणी रयत विद्यार्थी परिषदेचे प्रमुख संघटक ऋषिकेश कानवटे यांनी केली आहे.

कुदळवाडी-जाधववाडी येथील नैसर्गिक नाल्यावर पालिकेने अनधिकृतपणे ETP बांधकाम केले आहे त्याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांना निवेदन दिले कुदळवाडी-जाधववाडी येथील नैसर्गिक नाल्यावर पालिकेने अनधिकृतपणे ETP बांधकाम हटवण्यात संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई करू असे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील आश्वासन दिले.यावेळी निवेदन देताना रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, ओमकार भोईर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!