महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ जून) : मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सुलोचना दीदी यांचे निधन झाले आहे. सुलोचना दीदी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
शनिवारी (3 जून) सुलोचना दीदी यांची तब्येत अचानक बिघडली होती त्यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल रात्रीपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, आज उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
50 हून अधिक मराठी चित्रपटात साकारल्या मुख्य भूमिका
सुलोचना लाटकर यांनी 40 च्या दशकात मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली आणि अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेपासून ते चरित्र भूमिकांपर्यंत काम केलं आहे, तर त्यांनी 250 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित
सुलोचना दीदी यांना 1999 मध्ये पद्मश्री तर 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2009 मध्ये महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. शिवाय त्यांचा इतर अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…