Categories: Uncategorized

दिव्यांग मतदारांसाठी पीडब्ल्युडी ॲपची सुविधा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ फेब्रुवारी) :  दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’(सक्षम-ईसीआय) तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहता कामा नये, यासाठी दोन्ही मतदारसंघात मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध नागरिक, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती यांना प्रवृत्त करून मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी साह्य करण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे काम या माध्यमातून होत आहे.

‘मतदान प्रक्रियेपासून दिव्यांग व्यक्ती वंचित राहू नयेत, तसेच त्यांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन विशेष सोयी-सवलती उपलब्ध करून देणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना पोस्टल मतदनाची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांच्याकडून नमुना अर्ज १२-ड भरून घेण्यात येत आहेत.

मतदान केंद्रांवरील दिव्यांग मतदारांची एकूण संख्या विचारात घेऊन अशा मतदारांसाठी आवश्यक त्या सुविधा जिल्हा प्रशासन उपलब्ध करून देणार आहे. अंध व दृष्टी अधू असलेल्या मतदारांसाठी काचेचे भिंग, ब्रेल लिपीतील मतपत्रिका देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तींना सुलभतेने मतदान करता यावे आणि त्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे. दिव्यांग मतदारांना मदतीची आवश्यकता असल्यास त्यांना ‘पीडब्ल्यूडी ॲप’ मोबाइलवर डाउनलोड करावे. या ॲपद्वारे आवश्यक मदतीचे स्वरूप नोंदवता येते. इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँन्ड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये हे ॲप डाउनलोड करता येते. या ॲपची नोंद करणाऱ्या नागरिकाला त्यांच्या मोबाइलवर मदतीची नोंद केल्यानंतर युनिक आयडी मिळेल, त्यामुळे त्याला नोंद झाल्याचे लक्षात येईल.

लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी सहभागी व्हावे. मतदान करणे हे आपले कर्तव्य असल्याने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन डॉ.देशमुख यांनी केले आहे. जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील दिव्यांग मतदारांच्या बाबतीत अधिक जागरूक राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीला कामाला गती! … नागरिकांना मिळणार महापालिकेच्या सर्व सुविधा एकाच छताखाली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…

10 hours ago

चार वर्षात ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला थकबाकी नसलेल्याचा दाखला

  यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…

14 hours ago

जवानांना राख्या बांधून सांगवीच्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा रक्षाबंधन सण उत्साहात

  आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…

18 hours ago

रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद २३ वर्षांच्या अथक प्रवासात ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…

18 hours ago

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

1 day ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

2 days ago