Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी या योजनांचा लाभ घेण्याकरीता मुदत वाढ!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविणेत येतात.

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता योजनांचे जाहीर प्रकटन प्रसिध्द करणेत आलेले होते, सदर योजनांचे अर्ज भरणेकामी दि.३१/१०/२०२१ पर्यंत अर्ज मुदत देणेत आलेली होती.

Google Ad

तथापी, कोरोना-१९ चे प्रादुर्भावामुळे शहरातील शाळा, महाविद्यालय अजूनही सुरळीत सुरु न झाल्यामुळे तसेच महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया अद्यापर्यंत पुर्ण झालेली नाही. तसेच अर्जदारांना अर्जांमध्ये नमूद केलेनुसार प्रवेश घेतलेल्या संस्थेच्या प्राचार्य यांची सही व शिक्का प्राप्त करुन घेणे शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक अर्जदारांना, विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करणेकामी मुदतवाढ देणे आवश्यक होते.

त्याअनुषंगाने शैक्षणिक स्वरुप असलेल्या इतर कल्याणकारी योजनेच्या इ. १० वी मध्ये एकूण ८० ते ९० टक्के गुण संपादन केलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थ्यीनींना बक्षीस रक्कम, इ. १० वी मध्ये एकूण ९० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थ्यीनींना बक्षीस रक्कम,इ. १२ वी मध्ये एकूण ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थ्यीनींना बक्षीस रक्कम देणे या योजनांचे आणि महिला बालकल्याण योजना,

मागसवर्गीय कल्याणकारी योजना व दिंव्यांग कल्याणकारी योजना या अंतर्गतच्या इयत्ता १२ वी नंतरचे ( प्रथम वर्ष ) वैद्यकीय अभ्यासक्रम (M.B.B.S, B.A.M.S ,B.H.M.S., B.D.S., B.U.M.S,) M.B.A. आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा या शाखांमधील उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य या योजनांचे अर्ज नागरी सुविधा केंद्रात सादर करणेकामी दि.०१/११/२०२१ ते दि.३०/११/२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!