Google Ad
Editor Choice

चिंचवड मधील वाल्हेकरवाडीत आपल्या लाडक्या बाप्पाला इकोफ्रेंडली मखर घ्यायला नक्की या … उद्योजक ‘माऊली जगताप’ यांच्या हस्ते उद्घाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२६ऑगस्ट) : गणेशाचे आगमन पंधरवड्यावर येऊन ठेपले असून शहरवासीयांसह बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत, आपल्या घराचा गणेशा सर्वांत वेगळा दिसावा यासाठी पिंपरी चिंचवड शहरात ठिकाणी गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील ‘एक्झॉटिका डेकोरेशन’च्या वतीने चिंचवड-वाल्हेकरवाडी येथील ‘शुभम गार्डन’मध्ये घरगुती गणपतीसाठी सुबक व आकर्षक इकोफ्रेंडली मखरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Google Ad

या प्रदर्शनाचे उदघाटन उद्योजक ‘माऊली जगताप’, गुरुवर्य सोमनाथजी जुनवणे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, उद्योजक विशाल कदम, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, महाराष्ट्र टेंट डीलर वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष राहुल मुनोत, उद्योजक अमर आहेर, पिंपरी-चिंचवड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आण्णा कुदळे यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात लाडक्या बाप्पाकरिता आकर्षक आखीव व रेखीव आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक मखर आहेत. सुंदर व सुबक रंगसंगतीमध्ये असलेले हे मखर नागरिकांसाठी वाजवी किंमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. युवा उद्योजक सिद्धार्थ निकम व प्रथमेश कोलते यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

▶️अधिक माहितीसाठी संपर्क :-

सिद्धार्थ निकम, प्रथमेश कोलते
9561572731, 9975514457 किंवा 8010148662

Google Ad

About the author

Maharashtra14 News

91 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!