Google Ad
Uncategorized

खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : अहमदनगर तालुक्यातील एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली. या चिठ्ठित मनसे नगरसेवक वसंत मोरेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मोहन आत्माराम रक्ताटे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मोहन यांनी एका खासगी बँकेकडून कर्ज काढून मालवाहू टेम्पो विकत घेतला होता. परंतु, कर्जाचे दोन हफ्ते थकल्याने संबंधित बँकेने त्यांचा टेम्पो जमा केला. एवढेच नव्हेतर, मोहन यांच्या परस्पर बँकेने टेम्पो विकला. कोणतीही नोटीस न देता बँकेने टेम्पो विकल्याने आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्यामुळे मोहन यांनी रविवारी (10 डिसेंबर 2023) विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेची महिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यावेळी पोलिसांनी मृतदेहाजवळ चिठ्ठी साडपली. ही चिठ्ठी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या नावाने होती. “माझे दोन हफ्ते थकल्याने संबंधित बँकने माझा टेम्पो जमा करून कोणतीही नोटीस न पाठवता माझ्या परस्पर विकला, वसंत मोरेच मला न्याय मिळवून देतील”, असे त्याने आपल्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.

Google Ad

मोहन रक्ताटे यांनी 2022 मध्ये बँकेकडून कर्ज घेऊन मालवाहू टेम्पो खरेदी केला. यानंतर मोहन यांच्या वडिलांचे निधन झाले आणि महिन्याभरातच टेम्पोला अपघात झाला. दुरुस्तीच्या कामामुळे टेम्पो दोन महिने जागेवरच उभा होता. परिणामी, त्यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात बँकेचा हफ्ता देता आला नाही. यानंतर बँकेने मोहन यांचा टेम्पो जमा केला. टेम्पो विकून बाकीचे हफ्ते देण्याचा मोहन यांचा विचार होता. परंतु, त्यांचा आणि बँकचा व्यवहार जुळला नाही. यानंतर त्यांनी मित्राकडून पैसे घेऊन संपूर्ण कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. मात्र, बँकेकडून टाळाटाळ करण्यात आली. यामुळे या सगळ्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच वसंत मोरे यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. दरम्यान, वसंत मोरे यांनी संबंधित खासगी बँकेविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची विनंती केली. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास मनसे स्टाईलने हिसका दाखवण्यात येईल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!