महाविकास आघाडीमध्ये खळबळ ; काँग्रेस नेत्याने काँग्रेसच्याच मंत्र्यावर केला गंभीर आरोप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ऑगस्ट) : महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे असं वाटायला लागलं की लगेचं काही तरी खळबळ चालू होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आधीच सर्वत्र गदारोळ माजला असताना आता 150 कोटींच्या भ्रष्टाचाराचा काॅंग्रेस नेत्यावर आरोप झाला आहे. या आरोपांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे.

काँग्रेसचे नेते व माजी आमदार आशिष देशमुख यांनी आपल्याचं पक्षाचे नेते राज्याचे क्रिडामंत्री सुनिल केदार यांच्यावर हे आरोप केले आहेत. सुनिल केदार हे खूप मोठे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी नागपुर सहकारी बॅंक लुटली आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे. यासाठी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
2002 मध्ये सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष या पदावर होते. त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली आणि पूर्ण रक्कम गमवावी लागली. या दलाल कंपन्यांना सुनील केदार यांनी आपल्या स्वार्थासाठी ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी परस्पर दिली होती.

या दलालांनी त्या संपूर्ण रक्कमेचा अपहार करून बँकेला या पैशांचा हिशोब दिला नाही. व नागपूर जिल्हा बँकेचे 150 कोटीचं नुकसान झालं, असा आरोप देशमुख यांनी केला. केदार यांनी फक्त नागपूर बॅंकचं नाही तर वर्धा बॅंकेचे 30 कोटी व उस्मानाबाद बॅंकेचे 30 कोटी असे एकुण 210 कोटी बुडवले आहेत. हा असला घोटाळेबाज माणूस महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातुन काढून टाका असंही देशमुख म्हणाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्क करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

7 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago