लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने ‘श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा’ सोहळ्याचे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप मुख्य निमंत्रक आहेत.
‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, हभप सोपान महाराज शास्त्री, माऊली महाराज पठाडे, प्रकाश महाराज साठे, माजी महापौर माई ढोरे, अधीक्षक अभियंता संजीव राठोड, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, सुरेश चिंचवडे, तात्यासाहेब आहेर, माऊली सूर्यवंशी, इस्कॉनचे प्रमुख कन्हैया प्रभू, इस्कॉनचे ब्रजेशजी पांडे, पोपटराव शिवले, चंद्रहास वाल्हेकर, राजाभाऊ भुजबळ, कांतीशेठ भूमकर, मधुकर रणपिसे, पुण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक मोराळे, भानुदास काटे पाटील, हेमंत पाटे, राजाभाऊ गोलांडे, सुनील जाधव, सतीश दरेकर, राजाभाऊ विनोदे यांनी कथ श्रवणाचा आनंद घेतला.
भारत एक महान देश आहे. केवळ याच देशात आपण मूर्तीमध्ये देखील प्राण फुंकू शकतो. आज गणेश चतुर्थी आहे, आज आपण सर्वानीच गणपतीबाप्पाची मूर्ती खरेदी केली. मात्र, त्याची अदा केलेली किंमत ही, केवळ ती मूर्ती घडविणाऱ्याला दिली. मात्र, त्या मूर्तीमध्ये आपण घरी येवून स्वस्तिक काढून दहा दिवसांसाठी प्राणप्रतिष्ठा करतो, प्राणप्रतिष्ठेच्या माध्यमातून त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकतो. त्यावेळी खरोखरीच बाप्पा आपल्या मूर्तीमध्ये वास्तव्यास येतात, आणि त्या बाप्पाचे आपण पुढील दहा दिवस आदरातिथ्य करतो, असे म्हणताना, आध्यात्माची शक्ती पं. प्रदिपजी मिश्रा यांनी विशद केली.
***
भजन गाणाऱ्या कलाकारांसाठी कौतुकाची थाप
आज पाचव्या दिवशी पं. मिश्रा यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने अनेक भजने सादर करण्यात आली. या भजनाच्या तालावर अनेक भाविकांनी ठेका धरला. मंत्रमुग्ध होवून गाणारे कलाकार आणि तेवढ्याच उत्कटतेने त्यांना साथ देणारे भाविक, हीच जुगलबंदी आज रंगली होती. अनेक भाविकांनी टाळ्या आणि हात उंचावून भजन म्हणणाऱ्या कलाकारांनाही मनापासून दाद दिली. भजनानंतर झालेल्या आरतीने भक्तीमय वातावरणाची निर्मिती झाली आणि पाचव्या दिवसाची कथा पूर्णत्वास गेली.
**
मेरी माटी मेरा देश… अभियानासाठी पंचप्राण शपथ…
दरम्यान, भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी, जवानांनी, क्रांतिवीरांनी स्वत:च्या जीवाची आपल्या घरादाराची- कुटुंबाची पर्वा न करता भारतभूमीसाठी प्राण दिले. बलिदान केले. अशा भारतमातेच्या वीर सुपुत्रांचे स्मरण, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘‘मेरी माटी मेरा देश’’ अभियानाच्या निमित्ताने आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘‘पंचप्राण शपथ’’ घेण्यात आली. भारत देश २०४७ पर्यंत सर्वक्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा. या करिता प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प या निमित्ताने केला.
– शहरामध्ये निर्जंतुकीकरण करुनच पाणीपुरवठा; कोणतीही फिल्टर मशीन बंद नाही ! – नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ जानेवारी : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'चं थैमान वाढत असल्याचं पाहायला मिळत…
महाराष्ट्र 14 न्यून, दि. २८ जानेवारी : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक -26 जानेवारी 2025) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…