Google Ad
Editor Choice

मुळशी उरवडेतील केमिकल कंपनीत 15 महिलांसह 18 जणांचा जीव घेणारी आग नेमकी कशी लागली?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७जून) : मुळशीच्या उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून जवळपास 15 महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही एक क्लोरोफाईड कंपनी होती. या कंपनीत सध्या सॅनिटाझर बनवलं जात होतं. मात्र, या कंपनीत आज दुपारी मोठा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीत मोठी आग लागली. या आगीत होरपळून 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आग नेमकी कशी लागली?

Google Ad

संबंधित घटना ही उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस या कंपनीत घडली. दुपारी अडीचच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दुरपर्यंत गेला. स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली. संबंधित कंपनी ही क्लोरिफाईडची असल्याने आग जास्त भडकली. आगीमागील नेमकं खरं कारण काय? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

वॉटर प्युरीफायरसाठी लागणारं क्लोराईड नावाचं केमिकल बनवणारी ही कंपनी होती. आगीनंतरही कंपनीत क्लोरीन, क्लोराईडचे बॉक्स दिसत आहेत. केमिकल कंपनी असल्यामुळे आग जास्त धुमसली. जिल्हाधिकाऱ्यांनी आगीत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीच्या मालकांनी आगीत 17 जण गमवल्याची तक्रार केली होती. आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागले आहेत. ते सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. जवान अजूनही रेस्क्यू करत आहेत. पण आगीवर नियंत्रण मिळालं आहे. सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!