महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ ०ऑक्टोबर २०२२) : आंतरराष्ट्रीय मानवी हक्क न्यायिक सुरक्षा परिषद ही समाजातील दुर्बल , अन्याय झालेल्या समाजाच्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारी संस्था आहे . पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक दादासाहेब दराडे यांची, तर पुणे जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. देविदास शेलार आणि पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदी रत्नाताई पिंगळे यांची निवड करण्यात आली आहे . कुलदीप सिंग (राष्ट्रीय कोषाध्यक्ष) यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

याबाबत माहिती देताना दादासाहेब दराडे म्हणाले, “कि आमचा मुख्य उद्देश समाजाला गुन्हेगारी व गुन्हेगारांपासून मुक्त करणे , नागरिकांना कायदेशीर हक्क आणि योग्य न्याय देणे , जनतेच्या मनातून पोलिसांबद्दलची भीती दूर करणे , गरीब आणि असहाय लोकांना मदत करणे , महिलांवरील अत्याचार थांबवन्यासाठी कार्य करणे , पर्यावरणीय प्रदूषणास प्रतिबंध , भ्रष्टाचाराला आळा घालणे , लोकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करणे , सरकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत (आम आदमीपर्यंत) पोहचवणे , समाजात प्रचलित असलेल्या कामगारांच्या शोषणाला प्रतिबंध करणे हा आहे .
दादासाहेब दराडे हे बारामती येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत, तर डॉ. देविदास शेलार हे पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथील रहिवासी असून, महाराष्ट्र14 न्यूज चे मुख्य संपादक आहेत. ते पिंपरी-चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून सर्व समाजातील वंचित दुर्बल घटकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय मिळवून देणे यासारखे समाजसेवेचे कार्य करत आहेत, ते भारतीय जनता पक्षाच्या सांगवी-काळेवाडी मंडल चे उपाध्यक्ष देखील आहेत. कोणत्याही वादात न पडता कोरोना महामारीच्या काळात त्यांनी चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून वाखाण्याजोगी कामगिरी केली. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक परिषदेच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
रत्नाताई सुरेश पिंगळे या राजमाता जिजाऊ महिला संस्था संस्थापिका ( अध्यक्ष), ग्रामपंचायत सदस्य वासुली व महिला दक्षता कमिटी सदस्य म्हाळुंगे चाकण पो . स्टेशन म्हणून कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यात महिलांना न्याय हक्क मिळवून त्यांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यासाठी खूप मोठे सामाजिक कार्य त्या करत आहेत