महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जून) : राज्यातील शाळा आजपासून गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत तसेच सर्व विद्यार्थी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सांगवी मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात आज दिनांक 14 जून 2024 रोजी शाळेतल्या चिमुकल्यांचा पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर प्रथमच शाळेत येताना कावरी बावरी झालेली ही मुले शाळेच्या प्रांगणात येताच संगीतमय वातावरणात हरवून गेली. नवा गणवेश नवे दप्तर, नव्या वह्या, पुस्तके, डबा, बॉटल, शूज, असा पेहराव करून स्वतःच्याच आनंदात नाचत डोलत होती. शिक्षणाची गुढी उभारून या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जाधव मॅडम व सर्व शिक्षकांनी फुलांच्या वर्षावात मुलांचे हर्ष उल्हासात स्वागत केले. मुलांना औक्षण करण्यात आले. नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांना पुस्तक व भेटवस्तू देण्यात आल्या मुलांना शाळेचा पहिला दिवस म्हणून गोड खाऊ सुद्धा वाटण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.अंजली पवार यांनी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जून) :रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्य सन…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२३ जून) : चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा सर्वात कळीचा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : औंध जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या जिल्हा आयुष रुग्णालयात आज २१…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख येथील उद्योजक श्री.बबनराव बाबुराव…