Google Ad
Editor Choice Education

सांगवी च्या ‘द न्यू मिलेनियम स्कूल व ज्युनियर कॉलेज’ चा प्रवेश उत्सव … मुलांचे स्वागत करत उत्साहाने साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ जून) : राज्यातील शाळा आजपासून पुन्हा जोमाने सुरु झाल्यात. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेट्स तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुलं देत, त्यांचं स्वागत करण्यात आलं. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच शाळा वेळेत आणि ऑफलाईन पद्धतीनं नेहमीप्रमाणे सुरु झाल्या आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी मधील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 15 जून 2022 रोजी शाळा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे प्रशालेत प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

पहिल्याच दिवशी शाळेमध्ये विविध कौशल्य, गाणी, गोष्टी यांचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा साहित्य यांची मांडणी करुन बाल जत्रेचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. या सर्व उपक्रमांत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभागी होऊन आपला वेळ व्यतीत केला. फार दिवसांनी वर्ग मित्राच्या सोबतीने मुलांनी आनंदाने शाळेचा पहिला दिवस साजरा केला.

यावेळी संस्थेचे सचिव श्री शंकर शेठ जगताप, सदस्य. सौ स्वाती पवार मॅडम, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ जयश्री माळी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ इनायत मुजावर, श्री देवराम पिंजन यांनी विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षाच्या शाळेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिल्पा थिगळे तसेच आभार सौ सुचिता खराडे यांनी केले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड मध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा सजल्या…

विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सजल्यात. कुठे फुलांच्या पायघड्या घातल्या गेल्यात तर कुठे रांगोळी आणि ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलय. महत्त्वाचं म्हणजे रेनकोट, खाऊचा डबा, पाण्याची बाटली, दप्तर या सगळ्यासोबत विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरही सोबत ठेवण्याच्या सूचना शाळेकडून देण्यात आल्यात. दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागलेली होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलीय आणि विद्यार्थी शाळेत रमल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!