Google Ad
Uncategorized

नवी सांगवी पिंपळे गुरव मध्ये चौकाचौकात, रस्त्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमण वाढले … रस्ते फुटपाथ कशासाठी ? नागरिकांचा मनपाला संतप्त सवाल !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ मार्च) : नवी सांगवी – पिंपळे गुरव येथे पदपथांवर अतिक्रमने वाढल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागत आहे. महापालिकेच्या वतीने तात्पुरती कारवाई केले जात असल्याने पुन्हा ही अतिक्रमणे ‘जैसे थे’ होत आहे. त्यातच रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत.

परिसरातील पदपथांवर सायंकाळच्या वेळी भाजीविक्रेते बसत आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यावर टेम्पो लावून भाजी विक्री करण्यात येत आहे. यात एम एस काटे चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौक, फेमस चौका चा समावेश आहे. तसेच दुकानदारांकडून ठिकठिकाणी पदपथांवर कायमस्वरूपी अतिक्रमणे करण्यात आली आहेत.

Google Ad

नवी सांगवीतील साई चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यासमोर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत अनेक दिवस धूळखात पडून आहेत. तसेच मुख्य चौकापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण केल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विक्रेत्यांमध्ये अनेक वेळा वाद होताना आढळतात. महानगरपालिकेकडे अनेक नागरिक याची तक्रार करत आहेत, परंतु तात्पुरती मलमपट्टी करण्याखेरीज महानगरपालिकेकडे कायमस्वरूपी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नसल्याचे वारंवार होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी वरून दिसून येते. त्यामुळे मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

वारंवार तक्रार करूनही मनपाचे अधिकारी जुजबी कारवाई करतात, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव भागात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली असून तरीही विक्रते रस्त्यावर आणि फुटपाथवर आपला व्यवसाय करत असल्याने नागरिकांना वाहन चालवणे आणि फुटपाथ चा वापर करता येत नसल्याच्या तक्रारी जेष्ठ नागरिक आणि महिला करत आहेत. त्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण विभागाने याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

सुरेश सकट (सामाजिक कार्यकर्ते)

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!