Google Ad
Editor Choice

प्रभागातील नगरसेवक निवडून आणण्यासाठी बूथ सक्षम करा- आ.महेश लांडगे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ डिसेंबर) : भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 30 शक्ती केंद्रप्रमुख व बुथप्रमुख भाजपा शहराध्यक्ष भोसरी विधानसभेचे आमदार आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शन बैठक दापोडी अग्रेसर येथे झाली. यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे ,मोरेश्वर शेडगे, शहर उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, जिल्हा सचिव देवदत्त लांडे, नंदू कदम, दापोडी पिंपरी मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर,बाळा ढवाण यांची उपस्थिती राहिली. शहर सचिव विशाल वाळुंजकर यांनी दापोडीतील कार्यकर्त्यांची भावना व मत आमदारांच्या समोर मांडताना ,न्याय व ताकत देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

त्यास शहराध्यक्ष आमदार महेशदादा यांच्याकडून
पक्ष प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहील,कार्यकर्त्याला सर्वतपरी मदत केली जाईल प्रभागात चारही नगरसेवक निवडून आण्यासाठी व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्व शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुख यांनी ताकतीने काम करावे असे मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले. विशाल सातपुते मंडल सरचिटणीस, मीनाक्षी गायकवाड महिला आघाडी मंडल सरचिटणीस, घनश्याम सकट प्रभाग अध्यक्ष निवड झाल्याचे नियुक्त पत्र महेश दादा लांडगे यांच्या हस्ते देण्यात आले.

Google Ad

शक्ती केंद्रप्रमुख रघुनाथ जवळकर,सागर फ़ुगे, जयश्री नवगिरे,मीनाक्षी दत्तात्रय गायकवाड, गणेश जवळकर,माऊली फुगे,धर्मेंद्र क्षीरसागर,नितीन जाधव, आबा कोळेकर, रामदास भांडे,आशिष सपकाळ, प्रभाग 30 मधील बूथ प्रमुख , कार्यकर्ते उपस्तित होते. स्वागत स्वीकृत नगरसदस्य संजय कणसे यांनी केले,तर प्रस्ताविक जिल्हा सचिव विशाल वाळूंजकर , सूत्रसंचालन विशाल सातपुते तर आभार सागर फुगे यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!