महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मे) : गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील विणकर 2% स्वतंत्र आरक्षण करीता लढत आहे, या समाजाला राजकीय सोडून सरकारी नोकरी आणि इंजिनिअरिंग शिक्षण मध्येच आरक्षण 2% होते, केंद्र सरकारच्या निर्णयातून 50 टक्के वरील आरक्षण रद्द होत असल्याने, या विणकर समाजाला 2% स्वतंत्र आरक्षण देण्याकरीता आता पुन्हा झगडावे लागणार आहे हे आरक्षण वाचवण्या करिता पुणे येथे विणकर समाजाची एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.
या एल्गार सभेमध्ये विणकर समाजातील सर्व जाती एकत्र येण्याचे आवाहन समाजातील आयोजकांनी केले आहे दिनकर समाजाला स्वातंत्र्य दोन टक्के आरक्षण आहे आणि स्वातंत्र विणकर महामंडळ असावे, वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण मध्ये देखील आरक्षण असावे याकरिता अभी नही तो कभी नही अशा संघर्ष करणारी घोषणा सर्व विणकर बांधवानी एकत्र येऊन केली आहे सद्या आहे ते आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर असल्याने सरकारला जागे करण्याकरता कोणत्याही लढ्याची तयारी समाज करीत आहे.
आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे यामुळे आता पुणे येथे 14 मे रोजी विणकर समाजाची आरक्षण पदाधिकारी बैठक सभा रविवार दिनांक १४ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री चौडेश्वरी मंदीर, देवांग हॉस्टेल, शारदा म.न.पा. शाळेच्या मागे, पिंपळे निलख, पुणे ४११०२० याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. याकरता आपण सर्व विणकर बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमचे संयोजक सुरेश दादा तावरे यांनी केले आहे .
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…