Google Ad
Uncategorized

आरक्षण वाचवण्या करिता विणकर समाजाचे , ‘चलो पुणे’ ! … पुणे येथे १४ मे रोजी महाराष्ट्रातील विणकर समाजाची एल्गार सभा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ मे) : गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील विणकर 2% स्वतंत्र आरक्षण करीता लढत आहे, या समाजाला राजकीय सोडून सरकारी नोकरी आणि इंजिनिअरिंग शिक्षण मध्येच आरक्षण 2% होते, केंद्र सरकारच्या निर्णयातून 50 टक्के वरील आरक्षण रद्द होत असल्याने, या विणकर समाजाला 2% स्वतंत्र आरक्षण देण्याकरीता आता पुन्हा झगडावे लागणार आहे हे आरक्षण वाचवण्या करिता पुणे येथे विणकर समाजाची एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.

या एल्गार सभेमध्ये विणकर समाजातील सर्व जाती एकत्र येण्याचे आवाहन समाजातील आयोजकांनी केले आहे दिनकर समाजाला स्वातंत्र्य दोन टक्के आरक्षण आहे आणि स्वातंत्र विणकर महामंडळ असावे, वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण मध्ये देखील आरक्षण असावे याकरिता अभी नही तो कभी नही अशा संघर्ष करणारी घोषणा सर्व विणकर बांधवानी एकत्र येऊन केली आहे सद्या आहे ते आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर असल्याने सरकारला जागे करण्याकरता कोणत्याही लढ्याची तयारी समाज करीत आहे.

Google Ad

आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे यामुळे आता पुणे येथे 14 मे रोजी विणकर समाजाची आरक्षण पदाधिकारी बैठक सभा रविवार दिनांक १४ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री चौडेश्वरी मंदीर, देवांग हॉस्टेल, शारदा म.न.पा. शाळेच्या मागे, पिंपळे निलख, पुणे ४११०२० याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. याकरता आपण सर्व विणकर बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमचे संयोजक सुरेश दादा तावरे यांनी केले आहे . सुरेश तावरे याच बरोबर समस्त कोष्ठी समाजाचे अध्यक्ष अरुण वरुडे यांनी देखील आव्हान केले आहे ह्या बैठकीला संपूर्ण राज्यातून विविध पदाधिकारी येण्याची अपेक्षा आहे त्याकरता विणकर समाजातील प्रत्येक जाती पोट जातीने यामध्ये सहभाग नोंदवून सरकारला जागे करण्याची गरज आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!