Google Ad
Editor Choice

राजमाता जिजाऊ उद्यान परिसरातील विद्युत रोषणाई ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ डिसेंबर) : पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान हा परिसरात आकर्षणाचा विषय झाला असून, येथील विद्युत रोषणाई नागरिकांना भुरळ घालत आहे. उद्यानाच्या आतमधील वातावरण नयनरम्य आहेच; उद्यानाबाहेरील विद्युत रोषणाईही उच्चभ्रू कुटुंबांचे आकर्षण ठरत आहे.

बाहेरील आवारात सायंकाळी आठ ते रात्री अकरा या वेळेत नागरीक कुटुंबासमवेत गप्पा गोष्टी करण्यासाठी, रंगीबेरंगी विद्युत झोतात रममाण होण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. विशेषतः आयटी क्षेत्रातील लोक, नोकरदार वर्ग, व्यवसायिक, राजकारणी, नागरिक, अधिकारी वर्ग दिवसभरातील कंटाळा घालवण्यासाठी काही क्षण एकांतात कुटुंबासमवेत इथे फेरफटका मारताना नियमित दिसतात. रात्री दहा नंतरही अनेकजण येथील परिसरात बैठक व्यवस्था केल्याने रंगीबेरंगी विद्युत झोतात गप्पा गोष्टींमध्ये रममाण झालेली काही कुटुंबीय दिसून येतात.

Google Ad

असेच गुरुवारी सायंकाळी साडेदहाच्या सुमारास ‘ड’ प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर, त्यांच्या पत्नी व कन्या या ठिकाणी एकांतात वेळ घालवत कुटुंबासमवेत गप्पा गोष्टी करताना दिसून आले. याचाच अर्थ राजकीय व्यक्तीही वेळात वेळ काढून निवांत क्षण व्यतीत करण्यासाठी इथे येताना दिसत आहेत. त्यामुळे हे उद्यान वरचेवर नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!