Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ संघटनेची निवडणूक …अंबर चिंचवडे यांनी हरकत घेत केली फेरमतमोजणीची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ संघटनेची निवडणूक २५ फेब्रुवारी रोजी नुकतीच पार पडली.

या निवडणुकीत अंबर चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला महासंघ पॅनल आणि बबनराव झिंझुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय शंकरअण्णा गावडे पॅनल मध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेवर विध्यमान अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी हरकत घेत, तातडीने फेरमतमोजणी करावी तोपर्यंत निकाल जाहीर करू नये . अशी भूमिका घेतली, आणि कधी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Google Ad

त्यात अंबर चिंचवडे यांनी म्हटले आहे की, मी निवडणुकीसाठी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता . त्याअनुषंगाने दि . २५/२/२०२२ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली निवडणुकीच्या अनुषंगाने आपण घेतलेल्या मतमोजणी मध्ये आपण स्पीकरवर जाहीर केलेप्रमाणे मला २५२५ मते मिळाल्याचे जाहीर केले व इतर उमेदवारांना अनुक्रमे २५३४ व ६४ मते मिळाल्याचे नमूद केलेले आहे . त्याचप्रमाणे अवैध ८६ मतपत्रिका असल्याचे जाहीर केली आहे . आपण जाहीर केल्याप्रमाणे निवडणुकीसाठी एकूण ५५०५ सभासद् उपस्थित असल्याचे कळविले आहे .

२५ फेब्रुवारी रोजीच्या कर्मचारी तथापि एकूण मतदारांची संख्या लक्षात घेतामध्ये आपण जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये जवळपास २९४ मतांची विसंगती दिसुन येत आहे . तरी फेरमोजणी करणेत यावी . अशी मागणी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी केली आहे.

तोपर्यंत कोणालाही अधिकृत निकालाची घोषणा करू नये . अन्यथा आपण चुकीचा निवडणूक निकाल जाहीर केले,असे समजून आपणा विरुद्ध योग्य ती न्यायालयीन कारवाई करणे भाग पडेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!