Categories: Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द …अजून कोणाला बसला धक्का … पण, महाराष्ट्रात घड्याळ चिन्हावर निवडणूक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय या पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. त्यामुळे आता हे तिन्ही पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे, त्यामुळे आता राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्ष राहणार नाही.

राष्ट्रीय पक्षाचे निकष जाणून घेऊयात…

जेव्हा लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात. तेव्हाच राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा प्राप्त होतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाल्यामुळे राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. निवडणुकीच्या वेळी सरकारी प्रक्षेपणांमध्ये वेळही दिला जातो.

1968 सालच्या सिम्बॉल ऑर्डरनुसार एखाद्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता गेली तर त्याला देशभरातल्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येत नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढता येणार नाहीत. पण राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढता येईल.

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात जागतिक परिचारीका दिन उत्साहात संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…

3 days ago

नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेजचा दहावी चा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…

4 days ago

माॅक ड्रील- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…

1 week ago

1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, महाराष्ट्र हे नाव कसं आणि कोणामुळे मिळालं? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०१ मे : धगधगता स्वाभिमान ही आपल्या महाराष्ट्राची आजपर्यंतची ओळख आहे. अनेक…

2 weeks ago