Categories: Editor Choice

माजी खा. गजानन बाबर यांची ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड..

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. १६ डिसेंबर २०२१) : ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे राज्यस्तरीय अध्यक्ष गजानन बाबर यांची ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन या संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. तसे पत्र त्यांना संघटनेकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.

दिल्लीस्थित ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचे देशभरात मोठे जाळे विस्तारलेले आहे. ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनच्या माध्यमातून गजानन बाबर यांनी राज्यातील सर्व रेशनीग दुकानदारांची एकत्रित मोट बांधून त्यांना न्यायहक्क मिळवून दिले आहेत. कोरोना संकटाच्या काळात रेशन दुकानदारांना विमा संरक्षण कवच व आदी मागण्यांसाठी त्यांनी उभारलेल्या मोठ्या लढ्याची शासनाला देखील दखल घ्यावी लागली होती. दुकानदारांच्या रास्त मागण्यांना देशपातळीवर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी त्यांच्यातील लढाऊ बाणा हेरूनच त्यांची संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्रात म्हटले आहे.

गजानन बाबर यांनी पिंपरी-चिंचवड येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. त्यानंतर त्यांनी आमदारकीदेखील भूषविली आहे. २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर ते मावळचे खासदार देखील झाले होते. आतादेखील ते चळवळीत अग्रस्थानी असतात. देशपातळीवरील संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी एका मराठी माणसाची निवड झाल्याने त्यांच्यावर राज्यभरातील सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

6 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

13 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago