Google Ad
Editor Choice

संस्कार टिकला की संस्कृति टिकते- शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ डिसेंबर) :  संस्कार टिकला तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर धर्म टिकतो व धर्म टिकला तर देश टिकतो असे मत माजी नगरसेवक व चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी जुनी सांगवी येथील दत्तआश्रम दत्त नाम सप्ताह व संगीत महोत्सवाच्या समारोप प्रसंगी बोलताना मनोगत व्यक्त केले.

सांगवीतील बालयोगी नंदकुमार दत्त आश्रमात दत्त जयंती निमित्ताने दत्त नाम सप्ताह व संगीत महोत्सवाचा भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला. दुपारी १२.३० वा. फुलांची उधळण करत ह भ प कु-हेकर महाराजांच्या उपस्थितीत दत्त जन्माचा सोहळा पार पडला. दत्त नामाचा गजर, दत्त जयंती निमित्त आश्रमाला केलेली मनमोहक फुलांची आरास एकीकडे व्हायोलिन वादनाच्या भक्तीरसात बुडालेले रसिक श्रोते व महाप्रसाद व दर्शनासाठी भाविकांच्या लागलेल्या रांगा अशा भक्तिमय वातावरणात प.पू.बालयोगी नंदकुमार महाराज स्थापित दत्त आश्रम दत्तनाम सप्ताह व संगीत महोत्सवाची सांगता झाली.

Google Ad

बुधवार ता. ३० नोव्हेंबर ते बुधवार ता.७ डिसे. दत्त जयंती नाम सप्ताह संगीत महोत्सवात प्रख्यात गायक,वादक, किर्तनकार यांनी सेवा केली. यात किर्तनकार चारूदत्त आफळे,गौरी पाटील, शास्त्रीय गायिका सुनिता टिकारे,शाश्वती चव्हाण, प्रसिद्ध बासरी वादक पं.केशवराव गिंडे, तबला वादक समीर सुर्यवंशी, शास्त्रीय गायक मिनल अग्नीहोत्री नातु, स्वानंदी नाईक,मंजिरीताई आलेगावकर,बाबुराव जी बोरगावकर,रामेश्वर डांगे,रमाकांत गायकवाड,संपदाताई मांडके विपट,पं.राजकुमार बार्शीकर, प्रसिद्ध व्हायोलिन वादक स्वप्ना दातार या दिग्गज कलाकार मंडळींनी सप्ताहात संगीत सेवा केली.दत्त जयंती निमित्त सकाळी दत्तगुरु पादुकांचा अभिषेक,श्री महादेव तुपे व सहका-यांचे शहनाई वादन व प्रसिद्ध चौघडा वादक जयंत नगरकर व सहका-यांचे चौघडा वादन झाले. मारूती महाराज कु-हेकर यांच्या दत्त जन्मोत्सवाच्या किर्तनाचा भाविकांनी आस्वाद घेतला. ह.भ.प.संदिप महाराज, डॉ.नरेंद्र हरी सहस्रबुद्धे, यांच्या उपस्थितीत संगीत महोत्सवाचा समारोप करण्यात आला. सप्ताहाचे संयोजन ह भ प तुकाराम भाऊ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!