Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या जनसंवाद सभेच्या वेळी अधिकारी आपापल्या कार्यालयातील लाईट पंखे तसेच सुरू ठेऊन सभेस हजर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२५ एप्रिल) : शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी, तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येक सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभा आयोजित करण्यात येते.

आज सोमवारी महापालिकेच्या ‘ड’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात वेगळे च चित्र पहायला मिळाले.  जनसंवाद सभेला जाताना अभियंता, कनिष्ठ अभियंता, अधिकारी हे कार्यालामधील लाईट, एसी, पंखे, सुरूच ठेवून जात असल्याचे चित्र आज निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर क्षेत्रीय अधिकारी देखील आपल्या केबिन मधील लाईट, पंखे, एसी चालूच ठेवून जात आहेत. एकीकडे महावितरण सामान्य जनतेची वीज बिले न भरल्याने पिळवणूक करीत आहे. नागरिकांना वीज जपून वापरा असे आवाहन करीत आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्याच क्षेत्रीय कार्यालयात अधिकारी वर्ग बेशिस्तपणे वीज सुरू ठेवून जनसंपर्क सभेला दोन ते तीन तास जात आहेत. हे पंखे आणि लाईट जाताना बंद करायचे काम कोणाचे ? असा प्रश्न करदात्या सामान्य नागरिकांना पडला आहे.

Google Ad

अधिकारी आपल्या कार्यालयात नसताना , त्याठिकाणी कामकाज सुरू नसतानाही कार्यालयात, केबिनमध्ये लाईट, पंखे, एसी सुरू ठेवल्याने महावितरणची वीज विनाकारण वाया जात असल्याचे चित्र येथील ‘ह’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात पहावयास मिळाले. तसेच नागरिकांच्या कररूपी पैशातून महापालिका हे वीजबिल भरणार हा नाहक भुदंड कोणाच्या माथी? यांना याचा जाब कोण विचारणार? असा प्रश्न भेडसावत आहे. सोमवारी नेहमी प्रमाणे प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात वेळेनुसार सकाळी दहा वाजता सहावी जनसभा सुरू झाली.

यावेळी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात सभेला मुख्य समन्वय अधिकारी म्हणून अध्यक्षपदी पर्यावरण विभाग सह शहर अभियंता मुख्य समन्वय संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात स्थापत्य अभियंता विजयसिंह भोसले, पाणीपुरवठा अभियंता राहुल पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.

ड क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेत मुख्य समन्वयक अधिकारी म्हणून उपायुक्त नागर वस्ती विभागाचे अजय चारठणकर, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, प्रभाग कार्यकारी अभियंता विलास देसले उपस्थित होते.

सहाव्या जनसंवाद सभेला ह क्षेत्रीय कार्यालयात एकूण वीस तक्रारी अर्ज आले होते. तर ड क्षेत्रीय कार्यालयात एकूण सात तक्रारी अर्ज आले होते. या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचे समन्वय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांनी सांगितले. सर्वाधिक प्रश्न ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात पाणी पुरवठा संदर्भात तक्रारी आल्या होत्या. तर ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात ड्रेनेज तुंबणे, पाणी पुरवठा, राडा रोडा, डांबरीकरण यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या.

दापोडी येथील सिद्धी टॉवर्स समोरील शितळादेवी चौक येथील राडा रोडा काढणे, दापोडी रेल्वे गेट येथील भाजी मंडईतील भाजी विक्रेत्या महिलांकरीता चांगल्या प्रकारचे शौचालय त्वरित उपलब्ध करून करून द्यावे.
सुषमा शेलार, शिवसेना
———————————————-
राहटणी, पिंपळे सौदागर या भागात तसेच लिनियर गार्डनमध्ये येणाऱ्या महिलांच्या करीता या ठिकाणी महिला स्वच्छतागृह असावेत, तसेच गर्दीच्या चौकात ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत.
अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!