Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४जुलै) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच आहे. आज पुन्हा एकदा महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. राज्य सरकारने आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ओ. पी. गुप्ता, रुबल अग्रवाल, दीपककुमार मीना, राहुल रेखावार, दौलत देसाई अशा अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदल्या करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांची यादी वाचा सविस्तर

1 .ओ. पी. गुप्ता (1992 च्या बॅचचे आएएस अधिकारी) यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता वित्त विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

Google Ad

2. विकास चंद्र रस्तोगी (1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

3. इंद्रा मल्लो (1999 च्या बॅचच्या आएएस अधिकारी) यांची एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबईचे आयुक्त पदावरुन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

4. अजित पाटील (2007च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथून सहसचिव पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे.

5. रुबल अग्रवाल (2008 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी) यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पदावरुन आता आयसीडीसी नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. दौलत देसाई (आयएएस 2008 बॅच) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची बदली वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या संयुक्त सचिवपदी मुंबईत झाली.

7. रुचेश जयवंशी (आयएएस: एमएच: 2009) जिल्हाधिकारी, हिंगोली यांची बदली महिला व बाल विभाग, पुणे येथे आयुक्तपदी करण्यात आली.

8. संजय यादव (आयएएस: एमएच: 2009) यांची बदली एमएसआरडीसी, मुंबई येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून झालीय.

9. शैलेश नवाल (आयएएस: एमएच: 2010), जिल्हाधिकारी, अमरावती यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी नियुक्त करण्यात आलंय.

10. आर. एच. ठाकरे (आयएएस: एमएच: 2010) यांना नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलंय.

11. जे. एस. पापळकर (आयएएस: एमएच: 2010) अकोला जिल्हाधिकारी यांची अकोला महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय

12. जी. एम. बोडके (आयएएस: एमएच: 2010)यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदावरून हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

13. राहुल अशोक रेखावार (आयएएस: एमएच: 2011) यांची अकोल्याचे एमएस एसिड कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदावरून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली

14. रवींद्र बिनवडे (आयएएस: एमएच: 2012) यांची जालनाच्या जिल्हाधिकारी पदावरून थेट पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आलीय

15. दीपककुमार मीना (आयएएस: एमएच: 2013) यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

16. पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता.

17. विजय चंद्रकांत राठोड यांना जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
18. निमा अरोरा यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

19. आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

20. डॉ. बी.एन.पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!