Google Ad
Editor Choice

कोरोनाच्या संकट काळात ‘सुप्रियाताई साळवी’ (काटे) आणि ‘अस्मिताताई कांबळे’ ठरतायेतं … दापोडीतील महिलांकरीता देवदूत!

महाराष्ट्र 14 न्यूज, दापोडी (दि.८मे) : आपलं घरदार कुटुंब सांभाळत, रुद्राराज महिला प्रतिष्ठान अध्यक्ष सुप्रियाताई शशांक साळवी (काटे ) तसेच कादंबरी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ अस्मिताताई असित कांबळे( मोरे) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कोरोना महामारी च्या काळात प्रतिष्ठान मार्फत दापोडी परिसरातील सर्व बचत गटातील महिलांना सक्षमीकरण करणे व महिला सबलीकरण करणे तळागाळातील गोरगरीब महिलांसाठी आरोग्य शिबीर राबवणे कोरोना महामारी च्या काळात आपण आपली व आपल्या कुटुंबाचे आरोग्याचे काळजी कशी घ्यावी हे कार्यशाळा घेऊन महिलांना शिकवून कोरोना वर मात करून विजय कसा प्राप्त करावा याचे महिलांना संघटित करून प्रशिक्षण देऊन कोरोना महामारी च्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी अनोखा उपक्रम राबवित आहेत.

त्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून तसेच महिला सशक्तीकरणासाठी महिलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून दररोज च्या धावपळीच्या जीवनात अनेक नागरिकांचे तसेच महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘रुद्र राज’ महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष सौ सुप्रियाताई शशांक साळवी (काटे) व कादंबरी महिला प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष सौ अस्मिताताई असित (कांबळे) मोरे यांच्यामार्फत सर्व महिलांना व नागरिकांना डी जीवन सत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे तसेच लोह युक्त सी जीवनसत्व कॅल्शियम युक्त अशा अनेक प्रकारच्या गोळ्या उपलब्ध करून गोळ्या महिलांना घरपोच वाटप करण्याचे कार्य करत आहेत.

Google Ad

सध्याच्या काळात आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे अन्नधान्य स्वरूपात जीवनावश्यक गोष्टी लक्षात घेऊन त्यांना मदतीचा हात देत आहेत, तसेच प्रतिष्ठान मार्फत घरगुती महिलांना व्यवसाय देण्याचे काम दररोज सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत सर्व योजना महिलांपर्यंत पोहोचण्याचे काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना विधवांसाठी पेन्शन योजना तसेच मुलींकरता मोफत सायकल वाटप शिष्यवृत्ती देणे मुलामुलींना पुढच्या शिक्षणासाठी बचत गटामार्फत विविध उपक्रम, बचत गटांना मोफत अनुदानाचा करीता पाठपुरावा, स्त्री ही अबला नसून सबला आहेत हे समाजामध्ये जाणीव करून देण्याचे देवदूता सारखे पाठीशी उभे राहण्याचे कार्य रुद्र महिला प्रतिष्ठान मार्फत तसेच कादंबरी महिला प्रतिष्ठान मार्फत अव्याहतपणे सुरू आहे. खरंच दापोडीतील गरीब गरजूंकरीता त्या खऱ्या ‘देवदूतच’ म्हणावं लागेल …

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!