Google Ad
Editor Choice india

Delhi : कोरोना काळात नागरिकांच्या खात्यात सरकार पाठवणार पैसे , कुणाला , किती मिळणार रक्कम

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका गरीबांना बसला आहे. सरकारने नोव्हेंबरपर्यंत गरीबांना मोफत धान्य वाटण्याची घोषणा केली होती. आता मोफत धान्य वाटप, मार्च 2021 पर्यंत दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे सरकारकडून जनधन अकाउंटमध्ये महिलांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये पाठवण्यात आले होते. आता मोदी सरकार पुन्हा एकदा सणासुदीचा काळ पाहता, गरीब महिलांच्या जनधन अकाउंटमध्ये 1500 रुपये पाठवण्याची तयारी करत आहे. गरीब कुटुंबातही सण साजरा व्हावा हा यामागचा सरकारचा उद्देश आहे.

Google Ad

मीडिया रिपोर्टनुसार, सरकार गरीब कुटुंबांसाठी तिसऱ्या मदत पॅकेजची तयारी करत आहे. सरकार गरीब कल्याण योजनेंतर्गत धान्य आणि पैसे देण्याची घोषणा करत आहे. सरकारने 20 कोटीहून अधिक महिला जनधन अकाउंटमध्ये मागील 3 महिन्यात 1500 रुपये पाठवले होते. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पंतप्रधान जनधन योजना लागू केली आहे.

कसं ओपन कराल जनधन अकाउंट –
पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत झिरो बॅलेन्समध्ये सेव्हिंग अकाउंट सुरू करता येईल. यात चेक सुविधा, इंश्योरन्ससारख्या अनेक सुविधा देण्यात येतात. कोणत्याही बँकेत, आवश्यक कागदपत्रांसह जनधन अकाउंट सुरू करता येतं.

कोणत्या कागदपत्रांची गरज –
जनधन अकाउंट ओपन करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करू शकता. जेणेकरून KYC पूर्ण करता येईल. जर यापैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास, आपला सेल्फ अटेस्टेड फोटो घेऊन, बँक अधिकाऱ्यासमोर सही करून अकाउंट ओपन करता येतं. जनधन अकाउंट ओपन करण्यासाठी कोणतीही फी भरावी लागत नाही. 10 वर्षांवरील कोणताही व्यक्ती हे अकाउंट ओपन करू शकतो.

अकाउंट ओपन केल्यानंतर या सुविधा मिळतात –
ओव्हर ड्राफ्टच्या सुविधेसह, रुपे डेबिट कार्डची सुविधाही देण्यात येते. डेबिट कार्डवर 1 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो. सरकारी योजनांचा जो लाभ मिळतो, तो थेट फंड अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!