महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ एप्रिल) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेच्या व्यवस्थापन समिती (संचालक मंडळ) सन २०२३-२०२८ ची पंचवार्षिक निवडणुक पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यकार्यालय येथे निवडणुक निर्णय अधिकारी श्री. पंकज राऊत यांच्या अधिकाराखाली पार पडली. या निवडणुकीत स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघाचे पॅनल प्रमुख तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची अध्यक्ष श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या संपुर्ण पॅनलचे उमेदवार बहुमतांनी निवडुन आले आहेत.
पॅनल प्रमुख श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचा कारभार अतिशय स्वच्छ व पारदर्शक व्यवहार व्यवस्थीत रित्या चालत आहे. पतसंस्थेची आर्थिक स्थिती पाहता संस्थेने सभासदांच्या ठेवींवर जास्तीत जास्त ९ टक्के व कन्यादान योजने अंतर्गत ठेवींवरील व्याजदर १० टक्के ते १०.५० टक्के देवुन सभासदांना बचतीच्या सवयी लावल्या आहेत. तसेच सभासदांना कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करुन सभासदांच्या आर्थिक अडचणी दुर करीत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवक पतसंस्थेची १५ वर्षांपुवी वार्षिक उलाढाल र.रु. १७ कोटी इतकी होती. तसेच सदर पतसंस्था श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना सदरची उलाढाल जवळपास र. रु. २०० कोटी इतकी झाली आहे. तसेच संस्थेची कर्ज मर्यादा र.रु. ५० हजार इतकी असताना सध्या कर्ज मर्यादा रक्कम २० लाख इतकी वाढविली आहे. सदर पतसंस्थेची थकबाकी दर ६५ टक्के असताना सध्या ०.००१ टक्का इतकी आहे. तसेच पतसंस्थेला सतत ऑडीट वर्ग-अ प्राप्त झालेला आहे.
पतसंस्थेच्या स्थापनेपासुन सलग ५० वर्षे नफा मिळवुन सदर नफ्यातुन सभासदांना जास्तीत जास्त १४ टक्के व १५ टक्के लाभांश वाटप करुन सभासदांना आर्थिक मदत करत आहे. पतसंस्थेमध्ये सलग २५ वर्षे सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षीस रक्कम म्हणुन र.रु. ५,०००/- वाटप करीत आहे. तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे संपुर्ण कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था आहे. सतत सभासदांच्या हितासाठी व तत्पर सेवेसाठी सदैव आग्रही आहे.
पॅनल प्रमुख श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे सलग चार पंचवार्षिक स्व. शंकर (आण्णा) गावडे कर्मचारी महासंघाचा संपुर्ण पॅनलला निवडुन दिल्याने श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांनी पतसंस्थेच्या सर्व सभासदांचे आभार मानले. पतसंस्थेचे नवनिर्वाचीत संचालक मंडळ श्रीमती. चारुशिला जोशी, श्री. नथा मातेरे, विशाल भुजबळ, शिवाजी येळवंडे, विश्वनाथ लांडगे, कृष्णा पारगे, संदिप कापसे, विजय नलावडे, सनी कदम, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, वैभव देवकर, विजय मुंडे, योगेश रानवडे, गणेश गवळी, अभिषेक फुगे, विजया कांबळे, अनिल लखन, ज्ञानेश्वर शिंदे हे सर्व बहुमतांनी विजयी झाल्याने पतसंस्थेच्या सर्व सभासद बंधु-भगिनींचे आभार व्यक्त केले.