Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

लसीचा तुटवडा असल्याने पिंपरी चिंचवड मनपाच्या फक्त या तीन केंद्रांवरच ४ मे रोजी होणार १८ ते ४४ वयोगटातील फक्त ६०० नागरिकांचे लसीकरण!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .०३ / ०५ / २०२१) : कोविड -१९ आजाराच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत . या उपाययोजनापैकी नागरिकांचे कोविड १९ लसीरकण करणे हा महत्वाचा घटक आहे . दि .०१ / ०५ / २०२१ पासून भारत देशामध्ये तसेच सर्व राज्यांमध्ये वर्ष १८ ते ४४ या वयोगटामधील नागरीकांचे कोविड -१९ लसीकरण करण्यात येणार असल्याचे मा . पंतप्रधान , भारत सरकार यांनी जाहीर केलेले आहे .

या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज रोजी ०३ लसीकरण केंद्रे- नवीन भोसरी रुग्णालय , नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रांच्या ठिकाणी ६०० नोंदणी केलेल्या नागरीक / लाभार्थ्यांपैकी ५८० लाभार्थीना लसीकरण करण्यात आले आहे .

Google Ad

तसेच उद्या दि .०४ / ०५ / २०२१ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील ६०० नागरिकांचे लसीकरण करण्याची कार्यवाही नवीन भोसरी रुग्णालय , नवीन जिजामाता रुग्णालय व प्रेमलोक पार्क दवाखाना केंद्रांच्या ठिकाणी सुरु राहणार आहे . याकामी नागरीकांनी / लाभार्थ्यांनी http://www.cowin.gov.in यासंकेतस्थळावर नोंदणी करुन Appointment घेणे बंधनकारक आहे . Appointment नसलेल्या नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी .

तसेच दि . ०४/०५/२०२१ रोजी लस साठा शिल्लक नसल्यामुळे वय वर्षे ४५ च्या वरील कोणत्याही नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार नाही याची देखील नोंद घेण्यात यावी . या अनुषंगाने सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की , फक्त नोंदणी करुन Appointment घेतलेल्या वय वर्षे १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थ्यांनी वरील तीन्हीं लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत उपस्थित रहावे , तसेच नोंदणी न झालेल्या नागरीकांनी लसीकरण केंद्राच्या परिसरामध्ये गर्दी करु नये व सहकार्य करावे, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!