Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र , शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र … येथे करा नोंदणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २९ मे २०२१) : ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र, शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र तसेच विशिष्ट व्यक्तींचे घरीच कोव्हीड -१९ रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नियोजन केले असून यासाठी ‘मी जबाबदार’ या अधिकृत ॲपद्वारे दि. १ जूनपासून नोंदणी करता येणार आहे अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

Google Ad

कोव्हीड -१९ रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिम जलदगतीने राबविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नवीन ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु होणार आहे. ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र लोकांना वाहनांमधून बाहेर न जाता लस शॉट घेण्याची परवानगी देतो. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, १८ ते ४४ वर्षे वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तसेच एक वर्षापेक्षा लहान बाळ असणाऱ्या स्तनदा मातांसाठी नवे लसीकरण केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.

आजारामुळे अंथरुणावर असलेले रुग्ण तसेच गतिमंद व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोव्हीड १९ रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेच्या ‘मी जबाबदार’ ॲपवर या लसीकरणासाठी दि.१ जून पासून नोंदणी करता येणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!