समाजात चांगले-वाईट लोकं राहत असतात. रागाच्या भरात एखाद्याकडून नकळत चूक घडते. कुणी धाडसी निर्णय घेऊन गुन्हा करतो. पण, कैद झाल्यानंतर त्याला पश्चाताप होतो.केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. ही शिक्षा भोगत असताना गुन्हेगाराला कैदी म्हणून जेलमध्ये राहावे लागते. अशावेळी त्याला कुटुंबाची आठवण येते. पण, जेलरच्या परवानगीने विशिष्ट वेळी कैद्याला भेटता येते. काल रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. आपणही बहिणीकडून राखी बांधावी, असं कैद्यांना वाटलं, ही त्यांची इच्छा ‘केंद्रीय मानवाधिकार संगठन’ नवी दिल्ली या संस्थेच्या महिलांच्या वतीने पूर्ण केली.
केंद्रीय मानवाधिकार संगठना नवी दिल्ली’ यांच्या माध्यमातून संघटनेच्या उपाध्यक्ष ज्योती गुरव यांच्या केंद्रीय मानवधिकाराच्या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीने पुण्यातील येरावडा जेल मधील बांधवाना राखी बांधून हे रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार संघटन नई दिल्ली यांस कडून महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर ज्योती शेंडे गुरव यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवळे यांच्या मार्गदर्शनानुसार कारागृहातील कैद्यांना रक्षाबंधन तसेच समुपदेशन केले, यावेळी उपस्थित कारागृह अधीक्षक खामकर ,पोलीस अधीक्षक पाटील ,कोकणे यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला, या कारागृहामध्ये प्रथमच केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली यांचा आगळावेगळा कार्यक्रम होत आहे येथील कैद्यांना कायमस्वरूपी समुपदेशनाची गरज आहे ,गुन्हेगार असला तरी तो माणूस आहे, मॅडम तुम्ही कायम सहकार्य करावे, संपर्कात राहावे , कैद्यांच्या काही मागण्या काही अडचणी यांचे निरसन करून केंद्रापर्यंत पोहोचवावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना डॉ.ज्योती गुरव म्हणाल्या, “समाजात चांगले-वाईट लोकं राहत असतात. रागाच्या भरात एखाद्याकडून नकळत चूक घडते. कुणी धाडसी निर्णय घेऊन गुन्हा करतो. पण, कैद झाल्यानंतर त्याला पश्चाताप होतो.केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. ही शिक्षा भोगत असताना गुन्हेगाराला कैदी म्हणून जेलमध्ये राहावे लागते. अशावेळी त्याला कुटुंबाची आठवण येते. पण, जेलरच्या परवानगीने विशिष्ट वेळी कैद्याला भेटता येते. काल रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. आपणही बहिणीकडून राखी बांधावी, असं कैद्यांना वाटलं, ही त्यांची इच्छा ‘केंद्रीय मानवाधिकार संघटन’ नई दिल्ली या संस्थेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केली. त्यांचे जे काही प्रश्न असतील आणि त्यांना जी काही मदत लागणार आहे ती सर्व मदत करू, खरंच आजचा दिवस माझ्याकरता खूप अविस्मरनीय ठरला आहे”.
महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर ज्योती शेंडे गुरव (‘केंद्रीय मानवाधिकार संघटन’ नई दिल्ली) तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर शिक्षा भोगत असलेलेले कैदी आपल्या मनगटावरील राखी बघून काही वेळ भारावून गेले होते. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, (मुंबई), दि.२१ मार्च :- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल…
: मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील ‘ऑन ग्राऊंड’.... : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 05…
महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ : जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…