Google Ad
Editor Choice Technology

डॉ. डी वाय पाटील रुग्णालयात …कोरोनाबाधित रुग्णांवर “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती ठरत आहे प्रभावी  

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८जुलै) : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांवर “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती प्रभावी ठरत आहे. नुकत्याच पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये दोन कोरोना बाधित रुग्णांना “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार  देऊन पूर्णपणे बरे केले आहे.  मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.

 या औषधामध्ये दोन कृत्रिम रेणूंचे मिश्रण आहे जे कोरोना विषाणूंविरूद्ध नैसर्गिक मानवी प्रतिपिंडांची नक्कल करतात. हे औषध मोनोक्लोनल अँटीबॉडीज नावाच्या अत्यंत अत्याधुनिक औषधांच्या समूहांपैकी एक आहे. हे विविध प्रकारच्या आजारांविरूद्ध अत्यंत प्रभावी आहेत. या उपचार पद्धतीसाठी दोन रुग्ण निवडण्यात आले होते. यातील एक रुग्ण हा अतिजोखीम गटातील होता तर दुसऱ्या रुग्णामध्ये ताप, थकवा आणि इतर सौम्य लक्षणे दिसून आली होती.  त्यांची काळजीपूर्वक क्लिनिकल ट्रायल्ससाठी निवड करण्यात आली, या दोन्ही रुग्णांच्या रक्त वाहिनीमध्ये कासिरिव्हीमॅब आणि इंडेव्हिमॅब ही दोन इंजेक्शन्स सोडण्यात आली, ही औषधे शरीरात गेल्यावर विषाणूंना अवरोध  करतात  त्यामुळे कोरोना विषाणूंना दुसऱ्या पेशीत प्रवेश करता येत नाही व कोरोना रोखण्यास मदत मिळते.  24 तासाच्या आत या रुग्णांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले.  या उपचार पद्धतीद्वारे दोन्ही रुग्णांच्या शरिरातून कोरोनाची लक्षणे  गायब झाली, शिवाय या उपचारपद्धतीमुळे त्यांना इतर कोणता त्रास किंवा दुष्परिणाम ही झाले नाहीत. त्यांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले.  “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धतीद्वारे अतिजोखीम गटातील रुग्ण सात दिवसाच्या आत बरे होतात अशी माहिती रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाचे प्रमुख डॉ. (नि. ब्रिगेडिअर) एम. एस. बरथवाल यांनी दिली. ते पुढे म्हणाले कोरोनाच्या रुग्णामध्ये “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धतीद्वारे मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज परिणामकारक काम करत असल्याचं समोर आलं आहे.

Google Ad

 “कोरोना बाधित रुग्णांसाठी “अँटीबॉडी कॉकटेल” उपचार पद्धती ही प्रभावी असल्याचे सिद्ध झाले असून यामुळे एक आशादायी चित्र समोर आले आहे. यशस्वी उपचार  प्रक्रियेमध्ये सहभागी माझ्या टीमचा मला खूप अभिमान आहे.  आमची संस्था जागतिक स्तरावर  नवं नवीन वैद्यकीय उपचारासाठी  कायमच अग्रेसर आहे.” असे मत डॉ. डी वाय पाटील रुग्णालयाचे विश्वस्त  डॉ. यशराज पाटील यांनी व्यक्त केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

169 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!